सांगली - एरवी दुकानदार म्हटले की जादा दर वजनात घट यासारख्या तक्रारी ग्राहक करत असतात. पण सध्या कोरोना विषाणूने माणसातील माणुसकी जागी केली आहे. वाळवा तालुक्यातील सागर पाटील यांनी त्यांच्या गणेश पाडा येथील किराणा दुकानातून सामाजिक बांधिलकी जपत गणेश पाडा येथील नागरिकांना गरजोपयोगी वस्तूंचे वाटप केले.
माणुसकीचा झरा : सांगलीतील व्यावसायिक युवकाची मुंबईतील गरजूंना मदत, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप - गणेश पाडा बातमी
सागर पाटील यांचे मुंबईतील गणेश पाडा येथे किराणा मालाचे दुकान आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता त्यांनी सामाजिक जाणिवेतून गणेश पाडा येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. ग्राहक हा आपला राजा असतो माञ, तोच राजा सध्या आर्थिक संकटात सापडला असून त्याला मदत करणे गरजेचे असल्याचे मत सागर पाटील म्हणाले.
ग्राहक व दुकानदांच्यामध्ये नेहमी तूतू-मीमी होताना दिसत असते. परंतु सध्या संपूर्ण जगात कोरोना नावाच्या विषाणूने थैमान घातले असून देशात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये गोरगरीब, गरजू लोकांना रोजगाराविना पोट भरण्यासाठी वाताहत होत आहे. अशा परिस्थितीत कापूसखेड ता. वाळवा येथील सागर ज्ञानदेव पाटील या युवकाने मुंबईत आपल्या माणुसकीचे दर्शन घडवले.
सागर पाटील यांचे मुंबईतील गणेश पाडा येथे अनेक वर्षांपासून सिद्धनाथ कंज्यूमर्स स्टोअर्स नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. या भागातील नागरिक या दुकानातून जीवनावश्यक वस्तू खरेदी करत असतात. मात्र, कोरोनोच्या पार्श्वभूमीवर मुंबईत संचारबंदी लागू आहे. त्यामुळे, येथील नागरिकांना घरातून कामासाठी बाहेरही जाता येत नाही. अशा परिस्थितीत सागर पाटील यांनी सामाजिक जाणिवेतून गणेश पाडा येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. ग्राहक हा आपला राजा असतो माञ, तोच राजा सध्या आर्थिक संकटात सापडला असून त्याला मदत करणे गरजेचे असल्याचे मत सागर पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.