सांगली -इस्लामपूरच्या कोरोना रुग्णांची संख्या आता केवळ 'एक' उरली आहे. २ वर्षांच्या बाळासह त्याचे आई-वडीलही सोमवारी कोरोना मुक्त झाल्याचा अहवाल आला आहे. त्यांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. यामुळे जिल्ह्यात आता एकच कोरोना रुग्ण आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
सांगलीच्या इस्लामपूरमधील कोरोना बाधितांचा २६ वर पोहचलेला आकडा आता जवळपास संपुष्टात आला आहे. केवळ १ कोरोना बाधित रुग्ण आता जिल्ह्यात उरला आहे. शुक्रवारपर्यंत जवळपास २४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे अवघे दोन जण कोरोना बाधित रुग्ण उरले होते. ज्यामध्ये एका २ वर्षाच्या बाळाचाही समावेश होता. याआधी त्याच्या आई - वडिलांनाही कोरोनाची लागण झाली होती. गेल्या गुरुवारी त्यांची पहिली आणि शनिवारी कोरोना बाधित बाळाची पहिली टेस्ट करण्यात आली होती. ती टेस्ट निगेटिव्ह आली. रविवारी बाळासह आई वडिलांची करण्यात आलेली दुसरी चाचणी झाली. सोमवारी रात्री उशिरा याचा अहवाल मिळाला. तो निगेटिव्ह असल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यामुळे आरोग्य प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
सांगलीकरांना दिलासा.. कोरोनाबाधितांचा आकडा फक्त एकवर, दोन वर्षाच्या बाळासह आई-वडीलही रोगमुक्त..
इस्लामपूरमधील चार जण १४ मार्चला सौदी अरेबिया येथून तीर्थयात्रा करून आपल्या गावी इस्लामपूरमध्ये परतले होते. या चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे २३ मार्चला समोर आले होते. एका आठवड्यातच त्यांच्या कुटुंबातील तब्बल २६ जणांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनासह संपूर्ण सांगलीकरांना धक्का बसला होता.
आता मिरजेच्या कोरोना रुग्णालयात केवळ एकच कोरोना बाधित रुग्ण उरला आहे. सध्या त्याचीही प्रकृती उत्तम आहे. आतापर्यंत २६ पैकी २२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना कोरोना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन मिरजेतील इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईनमध्ये दाखल करण्यात आले आहे. सोमवारी कोरोनामुक्त झालेल्या बाळाला आणि त्याच्या आई-वडिलांनाही मंगळवारी इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन रवाना करण्यात येणार आहे. यामुळे सांगली प्रशासनासह सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
इस्लामपूरमधील चार जण १४ मार्चला सौदी अरेबिया येथून तीर्थयात्रा करून आपल्या गावी इस्लामपूरमध्ये परतले होते. या चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे २३ मार्चला समोर आले होते. एका आठवड्यातच त्यांच्या कुटुंबातील तब्बल २६ जणांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनासह संपूर्ण सांगलीकरांना धक्का बसला होता. यामध्ये वयोवृध्दांपासून २ वर्षांच्या बाळाचाही समावेश होता. त्यांच्या संपर्कात आल्याने वडगाव (जि. कोल्हापूर) येथील नातेवाईक माहिलेलाही कोरोना लागण झाली होती.