महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कमी जागा मिळाल्या तरी राष्ट्रीय समाज पक्ष युती सोबतच राहणार - मंत्री महादेव जानकर

सांगलीच्या जतमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती.

महादेव जानकर

By

Published : Sep 21, 2019, 11:19 PM IST

सांगली- "राष्ट्रीय समाज पक्षाच्या वाट्याला कमी जागा आल्या तरी, घटक पक्ष म्हणून आपण युती सोबतच राहणार,"अशी भूमिका पशुसंवर्धन मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी जाहीर केली आहे. तसेच धनगर समाजाला 90 टक्के आरक्षण मिळाले आहे. आता फक्त अध्यादेश काढायचा बाकी असल्याचेही मंत्री जानकर यांनी स्पष्ट केले आहे. सांगलीच्या जतमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

हेही वाचा-विश्व कुस्ती चॅम्पियनशीप: महाराष्ट्रीयन राहुल उपांत्य फेरीत पराभूत, 'कांस्य'साठी आशा कायम

सांगलीच्या जतमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाच्या नेत्या सह सांगली जिल्ह्यातल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

बोलताना मंत्री महादेव जानकर

हेही वाचा-मुक्ताईनगर विधानसभा : एकनाथ खडसेंच्या उमेदवारीविषयी संभ्रम; सेना जागेसाठी आग्रही

राष्ट्रीय समाज पक्ष कलेकलेने वाढतो आहे. तर मुख्यमंत्री यांनी आम्हाला जी मदत केली. त्यावर मी आणि माझा पक्ष खुश आहे. त्यामुळे एक दोन जागेसाठी भांडण होणार नाही. माझ्या मनासारख्या जागा मुख्यमंत्री मला देणार आहेत. आणि त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाला जादा किंवा कमी जागा मिळाल्या याबद्दल हरकत नसणार आहे. आम्ही युतीसोबतच राहणार आहोत. धनगर आरक्षणाची आता काळजी नाही. 90 टके आरक्षण मिळाले आहे. फक्त आता अध्यादेश काढायचे बाकी आहे. आता देखील भाजपचेच सरकार येणार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असा विश्वास देखील मंत्री जानकार यानी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details