सांगली- माजी मंत्री व कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांच्या निधनावर शेतकरी संघटनेने शोक व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांचा वकील हरपल्याची भावना यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.
राम जेठमलानींच्या निधनाने शेतकऱ्यांचा वकील हरपला- रघुनाथदादा पाटील - शेतकरी संघटना नेते रघुनाथदादा पाटील
माजी केंद्रीय कायदा मंत्री व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांचे आज निधन झाले असून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शोक व्यक्त करत शेतकऱ्यांचा वकील हरपल्याची भावना रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली देशातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी नादारी अंतर्गत सुप्रीम कोर्टात राम जेठमलानी यांनी वकील म्हणून उत्कृष्टरित्या काम पाहिले होते.
![राम जेठमलानींच्या निधनाने शेतकऱ्यांचा वकील हरपला- रघुनाथदादा पाटील](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4377259-912-4377259-1567948082149.jpg)
माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांचे निधन झाले आहे. यांच्या निधनावर शेतकरी संघटनेकडून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी राम जेठमलानी यांच्या आठवणींना उजाळा देत जेठमलानी म्हणजे शेतकऱ्यांचे वकील होते त्यामुळे शेतकऱ्यांचा वकील हरपल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली आहे. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली देशातील शेतकऱयांना कर्जमुक्त करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी नादारी अंतर्गत सुप्रीम कोर्टमध्ये राम जेठमलानी यांनी वकील म्हणून उत्कृष्टरित्या काम पाहिले होते. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय त्यांच्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिला होता. ज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जे अनैतिक असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाकडून त्यावेळी देण्यात आल्याचे रघुनाथदादा पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांवर राम जेठमलानी यांचे खूप उपकार आहेत अशी भावना रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त करत जेठमलानी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.