सांगली - रस्त्याच्या मागणीसाठी खानापूर तालुक्यातल्या करंजे येथील ग्रामस्थांनी हातात टाळ घेऊन लॉंग मार्च सुरू केला आहे. गावकऱ्यांना हक्काचा रस्ता मिळावा या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करंजे येथील ग्रामस्थांनी हे अनोखे आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी विटा तहसील कार्यालयावर हा लाँगमार्च धडकणार आहे.
रस्त्यासाठी ग्रामस्थांचा टाळ वाजवत लाँगमार्च; रस्ता मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा निर्धार - रस्त्याच्या मागणीसाठी टाळ वाजवत लाँगमार्च
मागील अनेक वर्षांपासून पाठपुरवठा करूनही शासन आणि प्राशासन लक्ष देत नसल्याने खानापूर तालुक्यातील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. यासाठी ग्रामस्थांच्या वतीन २५ किलोमीटरचा लाँगमार्च काढण्यात आला आहे. आता मागण्या पुर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
![रस्त्यासाठी ग्रामस्थांचा टाळ वाजवत लाँगमार्च; रस्ता मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा निर्धार लाँगमार्च](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8379704-476-8379704-1597153057240.jpg)
लाँगमार्च
ग्रामस्थांचा टाळ वाजवत लाँगमार्च