महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत अपक्ष उमेदवाराचा सायकलवरून प्रचार; पर्यावरण रक्षणाचा संदेश देत मागणार मते

दत्ता पाटील यांनी आपल्या सायकलवरून थेट मतदारांच्या गाठी-भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

By

Published : Apr 17, 2019, 11:07 AM IST

सायकलवरुन प्रचार करताना

सांगली - मला मत द्या, त्याच बरोबर पाणी जपून वापरा, झाडे लावा, पर्यावरणाचे रक्षण करा, असा सामाजिक संदेश देत एका अपक्ष उमेदवाराने चक्क सायकलवरून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. दत्ता पाटील असे या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे. पाटील ५ दिवसांत सांगलीच्या वाड्या वस्त्यांवर बाराशे किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करणार आहेत.

सायकलवरुन प्रचार करताना

सांगली लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात भाजप, स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात काट्याची टक्कर आहे. असे असले तरी या निवडणुकीच्या रिंगणात इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारही कमी नाहीत. अशा प्रकारचा सायकलवरुन केलेला प्रचार लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. दत्ता पाटील यांचे निवडणुकीचे चिन्हही सायकल पंप आहे.

सांगली लोकसभेसाठी अर्ज भरल्यानंतर सगळ्याच पक्षांचा प्रचार जोरदार सुरु आहे. आज पासून दत्ता पाटील यांनी आपल्या सायकलवरून थेट मतदारांच्या गाठी-भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. सांगलीच्या विकासासाठी आपले बहुमूल्य मत आपल्याला द्यावे, अशी विनंती करत पर्यावरण रक्षणाचा सामाजिक संदेशही पाटील देणार आहेत.

या प्रचाराच्या माध्यमातून दत्ता पाटील सध्याची पाणी टंचाई लक्षात घेता पाणी वाचवा आणि एक झाड लावा, असा सामजिक संदेश पाटील मतदारांना देत आहेत. आपल्या प्रचारासाठी दत्ता पाटील हे संपूर्ण लोकसभा मतदारसंघात सायकलवरून फिरणार आहेत. तब्बल बाराशे किलोमीटरचा हा प्रवास असून सलग ५ दिवस पाटील नॉनस्टॉप प्रचार करणार आहेत. मंगळवारी सांगलीमधून त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details