महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीतील लॉकडाऊनमध्ये 7 दिवसांची वाढ; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - सांगलीतील लॉकडाऊनमध्ये 7 दिवसांची वाढ

आता भाजीपाला, किराणा दुकान, बेकरी, फळ विक्रेते यांना सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत घरपोच सेवा देता येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. तर 26 तारखेपर्यंत सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत शेती विषयक आणि गॅरेज व स्पेअर पार्ट दुकानांनाही परवानगी देण्यात आली आहे, तर 19 ते 22 मे दरम्यान किरकोळ दुकानदारांसाठी मार्केट यार्ड सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत खुले राहणार राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सांगली लॉकडाऊन
सांगली लॉकडाऊन

By

Published : May 18, 2021, 2:35 AM IST

सांगली - कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊन आता सात दिवसांनी वाढवण्यात आला आहे. तर या लॉकडाऊनमध्ये 19 मेपासून 26 मेपर्यंत काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याचे सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी जाहीर केले आहे.



लॉकडाऊनमध्ये देण्यात आली शिथिलता

आता भाजीपाला, किराणा दुकान, बेकरी, फळ विक्रेते यांना सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत घरपोच सेवा देता येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. तर 26 तारखेपर्यंत सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत शेती विषयक आणि गॅरेज व स्पेअर पार्ट दुकानांनाही परवानगी देण्यात आली आहे, तर 19 ते 22 मे दरम्यान किरकोळ दुकानदारांसाठी मार्केट यार्ड सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत खुले राहणार राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात 5 मेपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू आहे.

15 म्युकरमायकोसेसचे आढळले रुग्ण

जिल्ह्यात 15 म्युकरमायकोसेसचे रुग्ण आढळले असून एकही जणाचा मृत्यू झाला नसल्याची माहितीही जिल्हाधिकारी चौधरी यांनी दिली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोरोना मृत्यू दर हा 2.25 इतका असल्याचेही चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details