महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन मोटारसायकलींच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल - स्पोर्ट्स बाईक

सांगलीच्या विश्रामबाग चौकात दोन दिवसांपूर्वी स्पोर्ट्स बाईक आणि बुलेट या दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक होऊन अपघात घडला होता. या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे.

अपघातग्रस्त दुचाकी

By

Published : Jul 24, 2019, 4:43 PM IST

Updated : Jul 24, 2019, 7:04 PM IST

सांगली - दोन दुचाकींच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे. विश्रामबाग चौकातून मिरजकडे जाणाऱ्या एका दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली होती. दोन दिवसांपूर्वी हा अपघात झाला होता. या अपघाताचा सीसीटीव्हीमध्ये रेकॅार्ड झालेला लाईव्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सांगलीच्या विश्रामबाग चौकात दोन दिवसांपूर्वी स्पोर्ट्स बाईक आणि बुलेट या दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक होऊन अपघात घडला होता.

व्हायरल झालेला व्हिडिओ
सांगलीहून एक स्पोर्ट्स बाईक दुचाकीस्वार मिरजच्या दिशेकडे भरधाव निघाला होता. त्याच वेळी समोरून येणाऱ्या बुलेटसोबत त्याची जोरदार धडक झाली होती. यामध्ये दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला होता. या दुचाकीस्वारांपैकी एक जण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज या भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. अपघाताचे लाईव्ह दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
Last Updated : Jul 24, 2019, 7:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details