सांगली - सांगली परिसरातील दंडोबा डोंगर याठिकाणी बिबट्याचे दर्शन झाले आहे. डोंगराच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आला आहे. बिबट्या आणि त्याचं पिल्लू दिसून आलं आहे. शनिवारी सांगली नजीकच्या परिसरामध्ये बिबट्या दिसल्याची जोरदार चर्चा सुरू होती. आज दंडोबा डोंगरावर प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन झाले आहे.
सांगली परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल
सांगली जिल्ह्यात कालपासून बिबट्याचा वावर असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. कसबे डिग्रज आणि कदमवाडी परिसरामध्ये बिबट्या आणि त्याचे पिल्लू दिसून आल्याची घटना समोर आली होती. आज सांगली नजीकच्या मिरज तालुक्यातल्या दंडोबा याठिकाणी बिबट्या आढळून आला. डोंगराच्या परिसरामध्ये बिबट्या आणि एक पिल्लू आढळून आले आहे. यावेळी काही नागरिकांनी श्वानांना घेऊन हुल्लडबाजी करत बिबट्या व त्याच्या पिल्लाचा पाठलाग केला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आता या बिबट्याला सुरक्षीत अधिवासामध्ये सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
हेही वाचा -घाटकोपरमध्ये स्लॅब कोसळून कार बुडाली पाण्यात; पाहा व्हिडिओ