महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जलसेतू पुलावरून खाली पडल्याने बिबट्याचा मृत्यू; चांदोली अभयारण्याजवळील घटना - Bridge

शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुमारे ३० ते ३५ फुटावरून खाली पडल्याने बिबट्या जागीच ठार झाला. शेजारी असणाऱ्या चांदोली अभयारण्यातील हा बिबट्या आहे. गेल्या काही दिवसांपासून अभयारण्यातील प्राणी मानवीवस्तीत येत असल्याच्या घटना घडत होत्या.

जलसेतू पुलावरून खाली पडल्याने बिबट्याचा मृत्यू; चांदोली अभयारण्याजवळील घटना

By

Published : May 18, 2019, 7:14 PM IST

सांगली - चांदोली अभयारण्याजवळील कॅनॉलच्या जलसेतुवरून खाली पडल्याने एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. शिराळा तालुक्यातील खूजगाव नजीकच्या कोकरूड-शेडगेवाडी रोडवर कॅनॉलसाठी बांधण्यात आलेल्या वारणा जलसेतु येथे ही घटना घडली आहे.

शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुमारे ३० ते ३५ फुटावरून खाली पडल्याने बिबट्या जागीच ठार झाला. शेजारी असणाऱ्या चांदोली अभयारण्यातील हा बिबट्या आहे. गेल्या काही दिवसांपासून अभयारण्यातील प्राणी मानवीवस्तीत येत असल्याच्या घटना घडत होत्या. हा बिबट्या अभयारण्यातून बाहेर पडून मानवी वस्तीत जाताना जलसेतुवरून तोल जाऊन खाली पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच वन विभाग घटनास्थळी पोहचले. यानंतर घटनेचा पंचनामा करत त्यांनी मृत बिबट्याला ताब्यात घेतले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details