महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जागेच्या वादातून २४ तासांपासून रखडला अंत्यविधी - सांगली

२६ जानेवारीला वांगी गावचे माजी सरपंच रामभाऊ औंधे यांच्या पत्नी रुक्मिणी यांचे निधन झाले. लिंगायत स्मशानभूमीत त्यांच्या दफनविधीची तयारी करण्यात आली. मात्र, गावातील एका समाजाने संबंधित जागेवर दफन विधी करण्यास आक्षेप घेतला. यामुळे मृतदेहावरील अंत्यसंस्कार २४ तासांपासून रखडले आहे.

last rites
जागेच्या वादातून २४ तासांपासून रखडला अंत्यविधी

By

Published : Jan 27, 2020, 2:12 PM IST

Updated : Jan 27, 2020, 3:11 PM IST

सांगली - गेल्या २४ तासांपासून एका मृतदेहाची अंत्यविधी विना हेळसांड सुरू आहे. सांगलीतील कडेगावच्या वांगी येथे हा प्रकार घडला आहे. स्मशानभूमीच्या जागेवरून हा वाद निर्माण झाला. गावात सध्या तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जागेच्या वादातून २४ तासांपासून रखडला अंत्यविधी

हेही वाचा - अदनान सामीच्या 'पद्मश्री' पुरस्काराला मनसेचा विरोध, पुढील कार्यक्रम उधळण्याचा इशारा

२६ जानेवारीला वांगी गावचे माजी सरपंच रामभाऊ औंधे यांच्या पत्नी रुक्मिणी यांचे निधन झाले. लिंगायत स्मशानभूमीत त्यांच्या दफनविधीची तयारी करण्यात आली. मात्र, गावातील एका समाजाने संबंधित जागेवर दफन विधी करण्यास आक्षेप घेतला. यामुळे मृतदेहावरील अंत्यसंस्कार २४ तासांपासून रखडले आहे. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी याबाबत प्रशासनाला आदेश दिले. मात्र, अद्यापही पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत.

हेही वाचा - कोरोना व्हायरसचा धोका वाढला, मुंबईत आणखी एक संशयित रुग्ण आढळला

वादग्रस्त जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा गावातील एका समाजाने केला आहे. याच जागेवर अनेक वर्षांपासून अंत्यविधी होत असल्याने रुक्मिणी औंधे यांच्या पार्थिवावरही येथेच अंत्यसंस्कार व्हावे, अशी भूमिका लिंगायत समाजाने घेतली आहे.

Last Updated : Jan 27, 2020, 3:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details