महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

८ दिवसांपासून पिण्याचे पाणी नाही, ईद साजरी करायची कशी, सांगलीतील ग्रामस्थांचा सवाल - रस्ते बंद

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये पुराच्या पाण्याने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे जिल्ह्यातील म्हैसाळ गावात गेल्या ८ दिवसांपासून पिण्याचे पाणी नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.

पुरामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई

By

Published : Aug 11, 2019, 10:03 PM IST

सांगली - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये पुराच्या पाण्याने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे जिल्ह्यातील म्हैसाळ गावत गेल्या ८ दिवसांपासून पिण्याचे पाणी नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

पुरामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई

पुराच्या पाण्यामुळे सर्व टिकाणी रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गावात पिण्याचे पाणी नसल्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. पिण्याचे पाणीच नाही तर ईद साजरी करायची कशी असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details