महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अक्षयतृतीये निमित्त बाजारात आंब्याची मोठी आवक, तरीही आंबा सांगलीकरांच्या आवाक्या बाहेर - Sangli market

अक्षय तृतीय निमित्त सांगलीची बाजार पेठ फळांचा राजा आंब्यांनी फुलून गेली आहे.अक्षय तृतीये दिवशी आंब्याला विशेष महत्व असते. मागच्या वर्षापेक्षा यावेळी आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आंब्याच्या दरामध्ये मोठया प्रमाणात घसरण होईल असा अंदाज होता. मात्र, आवक मोठ्या प्रमाणात झाली असली तरी आंब्यांच्या दरावर याचा परिणाम झालेला नाही. पेटी आणि बॉक्स च्या दरात केवळ २० ते २५ रुपयांची घसरण झाली आहे.

अक्षयतृतीये निमित्त बाझारात आंब्याची मोठी आवक, तरीही आंबा सांगलीकरांच्या आवाक्या बाहेर

By

Published : May 7, 2019, 6:35 PM IST

सांगली - अक्षयतृतीये निमित्त सांगली मध्ये आंब्यांची मोठी आवक झाली आहे. यामुळे संपूर्ण बाजार पेठ आंब्यांनी फुलून गेली आहे. अंब्याची आवक वाढली आहे. मात्र, आंबा अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे.

अक्षयतृतीये निमित्त बाझारात आंब्याची मोठी आवक, तरीही आंबा सांगलीकरांच्या आवाक्या बाहेर

अक्षय तृतीय निमित्त सांगलीची बाजार पेठ फळांचा राजा आंब्यांनी फुलून गेली आहे.अक्षय तृतीये दिवशी आंब्याला विशेष महत्व असते. यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा सांगलीच्या विष्णूअण्णा फळ मार्केट मध्ये दाखल होत असतो. यंदा आंब्यांचा हंगाम दोन आठवडे उशिरा सुरू झाला. त्यामुळे आब्यांचे दर गगनाला भिडले होते. परिणामी फळांचा राजा आंबा हा सर्वसामान्य सांगलीकरांच्या आवाक्याबाहेर गेला होता. मात्र, गेल्या वर्षापेक्षा यावेळी आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आंब्याच्या दरामध्ये मोठया प्रमाणात घसरण होईल असा अंदाज होता, आणि सर्वसामान्य जनतेला आंब्याची चव चाखण्यास मिळेल असे वाटत होते. सांगलीच्या मार्केटमध्ये रत्नागिरी, देवगड हापूस बरोबर कर्नाटक हापूस, पायरी, लालबाग तसेच आंध्राचा बदाम आंबा देखील बाजारामध्ये दाखल झाला आहे. सकाळी या आंब्यांच्या लिलावासाठी व्यापारी शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू होती. मात्र, आवक मोठ्या प्रमाणात झाली असली तरी आंब्यांच्या दरावर याचा परिणाम झालेला नाही. पेटी आणि बॉक्स च्या दरात केवळ २० ते २५ रुपयांची घसरण झाली आहे.

देवगड हापूसची आवक यावेळी वाढली आहे. त्यामुळे दरात साधरण घसरण झाली आहे. देवगड हापूसचा दर ४०० ते ६०० रुपये डझन तर चार डझन रत्नागिरी हापूस पेटी १३०० रुपये आहे. रत्नागिरी पायरीचा दर ३०० ते ४०० रुपये डझन आहे. तर कर्नाटकचा हापूस दोन डझनचा बॉक्स ५०० ते ७०० रुपये आहे. लालबाग आंब्याचा ४ डझनचा दर २०० ते ४०० रुपये आहे.

मुज्जमील बागवान - व्यापारी ,विष्णुअण्णा फळ मार्केट, सांगली -

गुढीपाडव्याला आंब्याची आवक मर्यादितच राहिली होती. मात्र, अक्षय तृतीयेला आंब्याची मागणीही वाढली आणि बाजारात आंब्याची आवकही वाढली आहे. यामुळे दरात घसरण होऊन सर्वसामान्य सांगलीकरांना आंब्यांची चव चाखण्यास मिळेल असा अंदाज होता. आब्यांची आवक मोठ्या प्रमाणात होऊनही दर स्थिर असल्याने आंबा अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details