महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृष्णामाई ओसरतेय...सांगलीकरांना दिलासा - कृष्णा नदी बातमी

कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम असल्याने धरण क्षेत्रातून कृष्णा नदीपात्रात विसर्ग सुरू होता. यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. मात्र, पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे.

कृष्णेची वाढलेली पाणी पातळी ओसरू लागली

By

Published : Sep 7, 2019, 2:27 PM IST

सांगली -कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे. हळूहळू वाढलेली पाण्याची पातळी ओसरू लागली आहे. 9 इंचाने सांगलीत पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे कृष्णा काठच्या नागरिकांमध्ये पसरलेली पुन्हा महापुराची भितीही ओसरू लागली आहे.

तीन दिवसांपासून सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये सुरू असलेली वाढ, आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. शुक्रवारी सायंकाळी 29.3 फुटांपर्यंत पोहचलेली पाण्याची पातळी आता कमी झाली आहे. शुक्रवारी रात्री स्थिर झालेली कृष्णेची पाणी पातळी 9 इंचाने कमी झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम असल्याने धरणातून कृष्णा नदीपात्रामध्ये चार दिवसांपासून विसर्ग सुरू होता. 86 हजार क्युसेक्स इतका विसर्ग करण्यात आला होता. मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला 41 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीपात्रामध्ये सुरू आहे. धरणातुन सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे तीन दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत होती. ती शुक्रवारी रात्री 29.3 फुटांवर पोहचत स्थिर होऊन,ओसरू लागली आहे.

कृष्णेच्या पाणी पातळीत घट

तरी जिल्हा प्रशासनाने कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि संततधार पाऊस, हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीचा इशारा या सर्व पार्श्वभूमीवर तीन दिवस आधी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी पाण्याची पातळी 34 फुटांवर जाईल अशी शक्यता वर्तवत नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. मात्र, पावसाचा जोर मंदावल्याने आणि धरणातून कमी करण्यात आलेल्या विसर्गामुळे आता कृष्णा नदीची पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. एका महिन्यापूर्वी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अश्याच पध्दतीने वाढ होऊन महापूर आला होता. त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ लागल्याने पुन्हा महापूर येणार अशी भीती नागरिकांच्या मध्ये निर्माण झाली होती. पण शनिवारपासून कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरू लागल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेली महापुराची भीती ओसरू लागली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details