दुष्काळी खानापूरच्या घाटमाथ्याची तहान आता 'कृष्णामाई' भागवणार - tembhu
दुष्काळग्रस्त खानापूर घाटमाथ्यावर अखेर कृष्णेचे पाणी दाखल झाले आहे. टेंभू योजनेच्या माध्यमातून वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या खानापूरकरांचे स्वप्न साकार झाले आहे.
![दुष्काळी खानापूरच्या घाटमाथ्याची तहान आता 'कृष्णामाई' भागवणार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3904441-thumbnail-3x2-khanapur.jpg)
खानापूरच्या घाटमाथ्याची तहान भागणार
सांगली -दुष्काळग्रस्त खानापूर घाटमाथ्यावर अखेर कृष्णेचे पाणी दाखल झाले आहे. टेंभू योजनेच्या माध्यमातून वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या खानापूरकरांचे स्वप्न साकार झाले आहे. रविवारी सकाळी पाण्याचे पूजन करून, फटाके फोडून जल्लोषात कृष्णामाईच्या पाण्याचे स्वागत करण्यात आले. आशिया खंडातील सर्वात मोठी सिंचन योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेंभू योजनेच्या 5 व्या टप्प्याच्या माध्यमातून खानापूर भागात अखेर कृष्णामाईचे पाणी दाखल झाले आहे.
खानापूरच्या घाटमाथ्याची तहान भागणार