सांगली -कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे. परिणामी पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ झाली आहे.
कृष्णेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - water levels rise sharply
कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.
शहरातील आयर्विन पुला जवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 25 फुटावर पोहचली आहे. एका दिवसात तब्बल 10 फुटाने पाण्याची पातळी वाढली आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने औदुंबर मधील दत्त मंदिरात रात्री पाणी शिरले होते.
दरम्यान दोन दिवसांपासून कडेगाव ,पलूस, खानापूर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील पाणी मोठ्या प्रमाणात कृष्णा नदीच्या पात्रात मिसळत आहे. तर कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याची वाढती पातळी लक्षात घेत प्रशासनाकडून नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.