महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रदूषणाच्या विळख्यात कृष्णामाई, लाखो लिटर सांडपाणी ठरतंय गटारगंगा होण्याचे कारण - Rejuvenation of the Krishna River

सागंली जिल्ह्यातल्या कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना हेच प्रदुषित पाणी पिण्यासाठीही वापरात येत असल्याचे निदर्शास येत आहे. सांगली शहारात जवळपास 80 एमएलडी इतके सांडपाणी निर्माण होते. पण सर्व सांड-पाण्याचे विल्हेवाट लावण्यासाठी सांगली पालिका प्रशासनाकडे ठोस उपाययोजना नाही.

प्रदूषणाच्या विळख्यात कृष्णामाई,
प्रदूषणाच्या विळख्यात कृष्णामाई,

By

Published : Dec 13, 2020, 11:25 AM IST

Updated : Dec 13, 2020, 12:14 PM IST


सांगली- जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सांगली शहरातील जवळपास 40 एमएलडी इतके सांडपाणी थेट कृष्णा नदी पात्रात दररोज मिसळते, याशिवाय नदी काठच्या गावा-गावातील सांडपाणीचाही निचरा कृष्णेच्या पात्रातच होतो. त्यामुळे कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत प्रदूषण महामंडळाकडून विशेष समिती स्थापन करून नदी प्रदूषणाबाबत कृती आराखडा तयार करत तो शासनाकडे सादर केला आहे.

प्रदूषणाच्या विळख्यात कृष्णामाई,
प्रदूषणाच्या विळख्यात कृष्णा माई...सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून उगम पावलेली कृष्णा नदी 223 किलोमीटरचे अंतर पार करत सांगली शहरात पोहोचते. वाटेत कृष्णेला प्रदूषीत करणारे अनेक टप्पे ओलांडावे लागतात. मात्र सांगलीत पोहोचल्यानंतर स्वछ, निर्मळ कृष्णामाई गटारगंगा बनल्या शिवाय रहात नाही. कारण सांगली शहरातील सांड-पाणी दररोज थेट कृष्णा नदीत मिसळते. सांगली शहारात जवळपास 80 एमएलडी इतके सांडपाणी निर्माण होते. पण सर्व सांड-पाण्याचे विल्हेवाट लावण्यासाठी सांगली पालिका प्रशासनाकडे ठोस उपाययोजना नाही. परिणामी जवळपास 40 एमएलडी इतके सांडपाणी थेट कृष्णा नदीच्या पात्रात मिसळते. याशिवाय गावा-गावातील सांडपाणीही नदीत मिसळते. त्यामुळे स्वच्छ, निर्मळ समजली जाणाऱ्या कृष्णा नदीचे पात्र सांगलीत मात्र गटार गंगेत रूपांतर झाल्याचे पाहायला मिळते.
प्रदूषणाच्या विळख्यात कृष्णामाई,
शेरीनाला आणि राजकारण ..सांगली महापालिकेचा नियोजन शून्य कारभारामुळे कृष्णा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. शहरातील शेरीनाल्याची माध्यमातून मोठ्या प्रमाणात काही वर्षांपूर्वी थेट कृष्णा नदीत सांडपाणी पोहोचते आणि या शेरीनाल्याच्या प्रश्नावरून मोठा गदारोळही झाला आहे. या शेरीनाल्याच्या भोवती सांगलीचा राजकारण कित्येकदा फिरत राहिले, इतकेच नव्हे तर निवडणुकीच्या केंद्रबिंदू सुद्धा अनेक वेळा शेरीनाल्याचा मुद्दा राहिला आहे.
प्रदूषणाच्या विळख्यात कृष्णामाई,
योजना अस्तित्वात, तरीही प्रदूषणाचा प्रश्न कायम !युतीच्या काळात या शेरीनाल्याच्या सांड पाण्याच्या विल्हेवाट लावण्यासाठी धुळगाव योजना आखण्यात आली होती. शेरीनाल्यातून सांडपाणी उचलून ते स्वच्छ करून शेतीला देण्याची ही योजना आहे. मात्र अनेक वर्षे रखडलेली ही योजना काही वर्षांपूर्वी अस्तित्वात आली, पण पुन्हा निधी आणि तांत्रिक गोष्टींच्या अभावी ती वारंवार बंदही पडली. नुकत्याच आलेल्या महापुरात या योजनेचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकली नाही. परिणामी आजही अनेक वेळा शेरीनाल्याद्वारे मोठ्या प्रमाणात सांडपाणी कृष्णेच्या नदीत मिसळते.
प्रदूषणाच्या विळख्यात कृष्णामाई,
सामाजिक आंदोलने प्रभावहीन; ढिम्म प्रशासन..कृष्णा नदीच्या वारंवार होणारे प्रदूषण यावर अनेक वेळा सामाजिक संघटनांनी आवाज उठवला, आंदोलने केली. त्याची थोडीफार दखल सांगलीत अस्तित्वात असणाऱ्या प्रदूषण महामंडळाने घेतली सुद्धा, मात्र पालिकेवर प्रदूषण महामंडळाकडून कधी दंडात्मक कारवाई तर कधी नोटीसही बजावण्यात आल्या. त्यावर पालिका प्रशासनाने सांडपाण्याची उपाययोजना करण्यासाठी केवळ कागदी घोडे नाचविण्याचा उद्योग केल्याचे कित्येकदा समोर आले आहे.नदीचे प्रदूषण केवळ राजकीय मुद्दा..कृष्णेच्या प्रदूषणाबाबत सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर म्हणाले, माझे वय आता 43 आहे, आणि मी लहान पणापासून कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबतीत ऐकत आलो, पाहत आलो येथील प्रत्येक राजकीय पक्षांनी, नेत्यांनी शेरीनाला या मुद्द्यांवर नेहमीच निवडणूक लढवली आहे. अगदी नगरसेवक पदापासून खासदार-आमदारकीच्या निवडणुकीपर्यंत कृष्णा नदीच्या प्रदुषणाला कारणीभूत असलेला शेरीनाल हा केंद्रबिंदू राहिला. मात्र आजही कृष्णेच्या प्रदूषणाचा प्रश्न सुटू शकला नाही, या उलट नदीचे प्रदूषण आणखी वाढले आहे. अनेक आंदोलनानंतर शेरीनाल याठिकाणी सांडपाणी शुध्द करून शेतकऱ्यांना हे पाणी देण्याच्या दृष्टीने शेरीनाला-धुळगाव योजना अस्तित्वात आली, पण 27 कोटींची ही योजना आज 70 कोटी खर्च होऊन सुद्धा पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकली नाही. याचे कारण म्हणजे निकृष्ट पध्दतीने त्याचे काम झाले आहे.

कृष्णा नदीचे प्रदूषित पाणी सांगलीकर जनतेला प्यावे लागते-

तसेच सांगली शहरातून पुढे जाणारी कृष्णा नदी आणखी मोठ्या प्रमाणात दूषित होते,आणि पुढील शहरांना-गावांना प्रचंड दूषित पाणी प्यावे लागते, पण त्याबाबत कोणालाच काळजी नाही. पालिकेकडून खरंतर सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प निर्माण करणे गरजेचे आहे, पण ते होताना दिसत नसल्याचे मतही साखळकर यांनी व्यक्त केले.

प्रदूषण बाबत उपयोजना सुरू..!

कृष्णा नदीच्या प्रदूषण रोखण्याची जबाबदारी असणाऱ्या प्रदूषण महामंडळचे उपप्रादेशिक विभाग हे सांगली मध्ये आहे. येथील अधिकारी नवनाथ औताडे यांच्याशी याबाबत बातचीत केली असता, ते म्हणाले कृष्णा नदीचा प्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी प्रवेश केल्यानंतर नदी काठच्या गावातील सांड-पाणी, नदीत कपडे धुणे, जनावरे धुणे,असे अनेक प्रकार गावपातळीवर होत होते,तसेच जिल्ह्यातील नदीकाठचे अनेक साखर कारखाने किंवा इतर कारखाने हे आपले रसायनयुक्त पाणी थेट नदी पात्रात सोडत होते. मात्र प्रदूषण महामंडळाकडून वेळोवेळी कारवाई आणि उपयोजना करण्यात आल्याने कारखान्याचे पाणी आता नदी पात्रात मिसळणे थांबले आहे,आणि आता गाव पातळीवरील प्रदूषण रोखण्यासाठी नियोजन सुरू आहे.

शहराचे सांडपाणी करतंय कृष्णेला प्रदूषित-

सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीचे सर्वाधिक प्रदूषण हे सांगली महापालिका क्षेत्रात होते. शहारत दररोज जवळपास 80 एमएलडी इतके सांडपाणी निर्माण होते. यापैकी जवळपास 40 एमएलडी सांड-पाणी हे थेट कृष्णा नदी पात्रात मिसळते, पालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नसल्याने हे सर्व होत आहे. सांगली महापालिकेने सांडपाणी शुद्धीकरणासाठी 3 योजना तयार केल्या, पण यातील केवळ 1 अस्तित्वात आली आहे, जी सांगली शहरात शेरीनाल धुळगाव योजना, या योजनेच्या माध्यमातून सांगली शहरातील जवळपास 40 एमएलडी सांडपाणी प्रकियेद्वारे शेतीला देण्यात येत आहे. उर्वरित सांडपाणी हे नदी पात्रात मिसळते, पण तेही शुद्धीकरण करण्यासाठी योजना करण्यात आली असून त्याचे काम सुरू असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. लवकरच पालिकेच्या आणखी दोन योजना कार्यान्वित होतील, आणि नदी पात्रात मिसळणारे प्रदूषित पाणी जवळपास बंद होईल आणि प्रदूषण कमी होईल.

टास्क फोर्सची स्थापना आणि कृती आराखडा तयार-

राज्यातील नदी प्रदूषण बाबतीत राष्ट्रीय हरित लवाद आणि शासनाकडून नदी प्रदूषित कृती आराखडा तयार करण्यासाठी नदी पुनोरोथान समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसार कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबतीत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पर्यावरण सनियंत्रण दल स्थापन करण्यात येत आहे. याशिवाय महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ सांगली विभागाकडून कृष्णा नदीच्या प्रदूषण बाबतीत कृती आराखडा तयार करण्यात आला असून तो शासनाला सादर ही करण्यात आला आहे. लवकरचं कृती आराखडयानुसार गाव पातळीपासून शहरा पर्यंत प्रदूषण रोखण्यासाठी टप्प्या-टप्प्याने उपायोजना करण्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे औताडे यांनी स्पष्ट केले आहे.

वेळीच प्रदूषण रोखण्याचे गरज-

कृष्णा नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर बनत आहे, त्यामुळे शासनाने वेळेची यावर उपयोजना करुन कृष्णा नदीला प्रदूषणाच्या विळख्यातुन सोडवावा, अशी अपेक्षा सांगलीकर नागरीक करत आहे..

Last Updated : Dec 13, 2020, 12:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details