सांगली - संततधार पाऊस कायम असल्याने आणि धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. मिरजेजवळ कृष्णा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. कृष्णाघाटाच्या ठिकाणी पाण्याने 50 फुटांची पातळी ओलांडली आहे. तर याठिकाणी कृष्णा नदी पात्राबाहेर पडली असून नागरिकांचे जनावरांसह स्थलांतर सुरू आहे.
संततधार पाऊस, कोयना आणि चांदोली धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरणातून सुमारे 56 हजार तर सांगलीच्या चांदोली धरणातून 12 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग दोन्ही नदीत सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळी वाढ झाली आहे. परिणामी मिरजेतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.
हेही वाचा -सांगलीच्या कर्नाळ रस्त्यावर पाणी, वाहतूक बायपासमार्गे वळवली