महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जतमध्ये भांडण सोडविणाऱ्यावर चाकूने वार, दोघांना अटक - जत सांगली बातम्या

तक्रारदार दत्तात्रय कोळी त्यांची भांडणे सोडविण्यास तेथे गेला. दरम्यान, तू आमची भांडणे सोडविणारा कोण? असे म्हणत दोघांनीही आपल्याकडे असणार्‍या छोट्या चाकूने दत्तात्रय यांच्या तोंडावर अंगावर व डोक्यात गंभीर वार करून लाथा बुक्यांनी मारहाण केली.

जत
जत

By

Published : Aug 30, 2020, 1:46 PM IST

जत (सांगली) -शहरातील कन्याशाळा, स्वामी गल्ली येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या एकावर चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आले आहे. दत्तात्रय शेकाप्पा कोळी (वय ३१, रा. मंगळवार पेठ, जत) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून शनिवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत आज जत पोलीस ठाण्यात दत्तात्रय कोळी यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी संतोष गुरूदत्त कोळी (वय २८) व राकेश विठ्ठल कोळी (वय २९, दोघे रा. थोरली वेस, कोळी गल्ली, जत) अशा दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास संतोष कोळी व राकेश कोळी हे दोघे दारूच्या नशेत भांडण करत होते.

यातील तक्रारदार दत्तात्रय कोळी त्यांची भांडणे सोडविण्यास तेथे गेला. दरम्यान, तू आमची भांडणे सोडविणारा कोण? असे म्हणत दोघांनीही आपल्याकडे असणार्‍या छोट्या चाकूने दत्तात्रय यांच्या तोंडावर अंगावर व डोक्यात गंभीर वार करून लाथा बुक्यांनी मारहाण केली. यात दत्तात्रय हे गंभीर जखमी झाले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार एस. ए कणसे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details