सांगली- कर्नाटकातील एका तरुणाचा सांगलीत खून झाल्याची घटना समोर आली आहे. सांगलीच्या विजयनगर येथे ही घटना घडली आहे. आकाश शिराफगोल असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा कर्नाटकातील गोकाक येथील रहिवाशी आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. मैत्रिणीचा पाठलाग केल्याच्या वादातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
कर्नाटकातील तरुणाचा सांगलीत खून, 1 गंभीर - Sangali Crime news
अज्ञात 8 ते 10 जणांनी आकाशसह आणखी एकावर हल्ला चढवला. अज्ञातांनी आकाशला बेदम मारहाण करून त्याचा गळा दाबून खून केला. तर मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे.
आकाशचे वडील अशोक शिराफगोल हे मिरज रोडवरील विजयनगर येथे एका ठिकाणी वॉचमन म्हणून काम करतात. तर आकाश आपल्या वडिलांसोबत राहत होता. दरम्यान, अज्ञात 8 ते 10 जणांनी आकाशसह आणखी एकावर हल्ला चढवला. अज्ञातांनी आकाशला बेदम मारहाण करून त्याचा गळा दाबून खून केला. तर मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच मिरज पोलीस उपअधीक्षक संदीपसिंग गिल आणि विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.