सांगली - कर्नाटकच्या राजकीय घडामोडी सांगलीपर्यंत पोहोचल्या आहेत. कर्नाटकमधील कागवाडचे काँग्रेस आमदार श्रीमंत पाटील यांच्या सांगलीतील घरात गुरुवारी कर्नाटक पोलीस पोहोचले. कर्नाटक राज्यातील विधानसभेत पाटील अचानक गायब झाल्याने गुरुवारी गोंधळ झाला होता. त्यामुळे कर्नाटक विधानसभा सभापतींनी कर्नाटक पोलिसांना पाटील यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.
कर्नाटकच्या राजकीय घडामोडी सांगलीपर्यंत, काँग्रेस आमदार श्रीमंत पाटलांच्या सांगलीतील घरात पोहोचली कर्नाटक पोलीस
श्रीमंत पाटील यांना पळवल्याचा आरोप काँग्रेसने केल्यामुळे कर्नाटक विधानसभा सभापतींच्या आदेशानंतर कर्नाटक पोलीस आमदार पाटील यांच्या चौकशीसाठी सांगलीत दाखल झाले.
श्रीमंत पाटील यांचे सांगलीतील घर
पाटील यांना पळवल्याचा आरोप काँग्रेसने केल्यामुळे कर्नाटक विधानसभा सभापतींच्या आदेशानंतर कर्नाटक पोलीस पाटील यांच्या चौकशीसाठी सांगलीत दाखल झाले. यावेळी ते मुंबईतील रुग्णालयात असल्याचे सांगण्यात आल्याने कर्नाटक पोलीस परत फिरले. तर या घटनेची सांगली पोलिसांनीही दखल घेत आमदार पाटील यांच्या घरी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.