सांगली :महाराष्ट्र सीमाभागातील जनतेच्या भावना तीव्र आहेत. कर्नाटक राज्य महाराष्ट्राला खुले आव्हान देत असताना सीमा भागाची जनता डोळ्यात तेल घालून महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाकडे लक्ष देऊन आहे. शिवाय, तिकोंडी भागात कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे फलक लावून आंदोलन केले. याच पार्श्वभूमीवर उमराणी गावानेही सरपंच(Umrani Sarpanch Namda accuses) , उपसरपंचासह गावकऱ्यांनी एकत्र येत महाराष्ट्राचे लक्ष वेधण्यासाठी कर्नाटक राज्याचा व देशाचा राष्ट्रध्वज फडकवित, महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra government) वेळकाढू भूमिकेचा तीव्र शब्दात विरोध (Karnataka flag and placard put up in Umrani) केला.
प्रतिक्रिया देताना विद्यमान सरपंच विजयकुमार नामद
शासनाच्या वेळकाढू धोरणाविरोधात घोषणाबाजी :सीमाभागातील तिकोंडी गावाच्या पाठोपाठ येथील उमराणी गावातील ग्रामस्थांनी येथील ग्रामपंचायत समोर एकत्र येत, महाराष्ट्र शासनाच्या वेळकाढू धोरणाविरोधात घोषणाबाजी केली. या घटनेनंतर गावासह तालुक्यात कर्नाटक- महाराष्ट्र वादाचे वातावरण ढवळून निघाले होते. उपसरपंच संजय शिंदे, राष्ट्रवादी नेते राहुल सिंह डफळे, आप्पासाहेब देशमुख, महादेव राचगोंड, माधवराव डफळे, उत्तम शिंदे, चिक्कापा धोडमनी, संजय धोडमनी, आदीसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग (government of doing injustice to Jat taluka) नोंदवला.
दिशाभूल करण्याचे एकमेव काम :यावेळी सरपंच विजयकुमार नामद म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जतवर दावा केला. तरी महाराष्ट्र शासनाला येथील जनतेला काय वाटतेय, याची साधी विचारपूस करावी असे वाटत नाही. शिवाय, शासनाचा प्रतिनिधी ही इकडे फिरकत नाही. जत तालुक्यातील जनतेची मते घेऊन त्यांची दिशाभूल करण्याचे एकमेव काम शासनाने (Sarpanch Namda accuses) केले.
जत तालुक्यातील तिकोंडी येथील सर्व ग्रामस्थ कर्नाटकमध्ये जाण्यास इच्छुक आहेत. शनिवारी गावात कर्नाटकचेध्वज घेऊन पदयात्रा काढण्यात आली होती. कमानीवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्यात (Villagers march with Karnataka flag hiking) आला होता. जत पूर्व भागातील तिकोंडी गावापासून तीन किलोमीटरवर कर्नाटकातील विजयपूर जिल्हा आहे. ग्रामस्थांनी शनिवारी कर्नाटकचा ध्वज घेऊन ग्रामपंचायतीसमोरून बसस्थानकापर्यंत घोषणा देत पदयात्रा (CM Bommai placard put up In Tikondi) काढली होती.
पाठिंबा देण्यासाठी फेरी :कर्नाटकने तीन वर्षांपासून तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी तिकोंडीजवळच्या तलावात सोडले आहे. कर्नाटक सरकार वेगवेगळ्या सुविधा व अनुदान देते, तर महाराष्ट्र सरकार म्हैसाळ योजनेचे पाणी देणार, असे गेल्या ५० वर्षांपासून सांगत आहे. त्याच मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे. पाणी देण्याचे गाजर दाखवत आहे. आम्हाला महाराष्ट्र कोणतीही सुविधा देत नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला होता. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील ४२ गावांचा कर्नाटकात समावेश करण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले असून, त्या विधानास पाठिंबा देण्यासाठी फेरी काढण्यात (March With Karnataka Flag) आली होती.