महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आलमट्टीतून 5 लाख क्युसेक पाणी सोडण्यास कर्नाटक तयार; पूर ओसरण्यास होणार मदत - kolhapur flood

कर्नाटकच्या आलमट्टी धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना केली. त्यानुसार त्यांनी आलमट्टी धरणातून पाच लाख क्यूसेस पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

karnataka cm agreed to release water from almatti dam it will help to low down the water level in sangli and kolhapur

By

Published : Aug 8, 2019, 3:46 PM IST

Updated : Aug 8, 2019, 4:29 PM IST

मुंबई - सांगली-कोल्हापूर सध्या महापुराच्या कचाट्यात अडकले आहे. कृष्णा, वारणा आणि पंचगंगा तीनही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाण्याची पातळी कमी होत नसल्याने लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, या पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना आलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्याची विनंती केली होती. त्यावर कर्नाटक सरकारने आलमट्टीतून ५ लाख क्युसेक पाण्याच्या विसर्गाची तयारी दर्शवली आहे.

आलमट्टीतून पाणी सोडल्यास कृष्णा कोयना नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी कमी होणार आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती गंभीर आहे. सध्या या ठिकाणी एनडीआरएफ आणि स्वयंसेवी संघटनाकडून मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे.

Last Updated : Aug 8, 2019, 4:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details