महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांसह नेत्यांनी उडवला प्रचाराचा धडाका - काँग्रेस उमेदवार विक्रम सावंत

भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री तसेच इतर राजकीय नेत्यांना पाचारण करून मतदारसंघातील कन्नड भाषिक मतदारांना आकर्षित करण्याचा जोरदार प्रयत्न केला. प्रचाराला शेवटचे काही तास बाकी असल्याने उमेदवारांनी प्रचाराची कोणतीही संधी सोडली नाही.

सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांसह नेत्यांनी उडवला प्रचाराचा धडाका

By

Published : Oct 19, 2019, 4:33 PM IST

सांगली - भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री तसेच इतर राजकीय नेत्यांना पाचारण करून मतदारसंघातील कन्नड भाषिक मतदारांना आकर्षित करण्याचा जोरदार प्रयत्न केला. प्रचाराला शेवटचे काही तास बाकी असल्याने उमेदवारांनी प्रचाराची कोणतीही संधी सोडली नाही.

सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांसह नेत्यांनी उडवला प्रचाराचा धडाका

सांगली, जत, मिरज हे मतदारसंघ कर्नाटक राज्याच्या सीमेवर असल्याने या ठिकाणी कन्नड भाषिक मतदारांचा टक्का जास्त आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात कर्नाटक राज्यातील सत्ताधारी तसेच विरोधकांनी चांगलेच रान उठवले. यंदा प्रचारादरम्यान कर्नाटक राज्याच्या नेत्यांचा वावर दिसून आला. तसेच अनेक ठिकाणी प्रचारामध्ये कन्नड भाषिक पाट्यांचा समावेश होता.

जत मतदारसंघात सर्वाधिक कन्नड भाषिक मतदार आहेत. तिन्ही मतदारसंघात भाजप व काँग्रेस उमेदवारांनी कर्नाटक राज्यातील आपआपल्या पक्षाच्या नेत्यांना पाचारण करून सभांचा धडका उडवून दिल्याचे पाहायला मिळाले,
जत मतदारसंघात भाजपचे उमेदवार विलासराव जगताप यांच्या प्राचारार्थ कर्नाटकचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी व अन्य नेत्यांनी हजेरी लावत प्रचारसभा घेतल्या. याला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस उमेदवार विक्रम सावंत यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच माजी मंत्री एम.बी पाटील या काँग्रेसच्या नेते मंडळींना आणून सभा घेतल्या.

तसेच सांगली विधानसभा मतदारसंघातही याचप्रकारची परिस्थिती पाहायला मिळाली. भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारासाठीही कर्नाटक भाजपने मदतीचा हात पुढे केला. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, उद्योग मंत्री जगदीश शेट्टर यांनी येऊन प्रचाराचारात सहभाग घेतला.

काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज यांच्या दिमतीला कर्नाटकचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या धावले, त्यांनीही याठिकाणी सभा घेऊन कन्नड भाषिक आणि धनगर समाजाला साद घातली.

ABOUT THE AUTHOR

...view details