सांगली - जिल्ह्यातील ८३३ कराटेपटूंनी १० मिनिटात एकत्रित ५ लाख ५८ हजार ब्लॉक्स व ६ लाख ५८ हजार पंचेस मारण्याचा विक्रम नोंदवला आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली असून हा जागतिक विक्रम असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. दरम्यान अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेले नाही.
सांगलीत कराटेचा विश्वविक्रम, ८३३ कराटेपटूंनी १० मिनिटात मारले 'इतके' लाख पंच - सांगलीत ब्लॉक्स आणि पंचेस मारण्याचा रेकॉर्ड
सांगलीच्या ८३३ कराटेपटूंनी १० मिनिटात एकत्रित ५ लाख ५८ हजार ब्लॉक्स व ६ लाख ५८ हजार पंचेस मारण्याचा विक्रम नोंदवला आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली असून हा जागतिक विक्रम असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
कन्नजुंकू कराटे चॅम्पियन्यस अकॅडमीतर्फे महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांगलीतील अरवाडे हायस्कुलच्या मैदानावर आज (ता. २ फेब्रुवारी ) सकाळी हा उपक्रम पार पडला.
यात ३ ते २१ वयोगटातील एक हजाराहून अधिक कराटेपटूंनी सहभाग नोंदवला होता. या विक्रमासाठी पहिल्या १० मिनीटांमध्ये ८३३ कराटेपटूंनी ५ लाख ५८ हजार ११० ब्लॉक्स मारले आणि त्यानंतरच्या १० मिनिटात ६ लाख ५८ हजार ७० पंचेस मारत विक्रम नोंदवला. दरम्यान, हा जागतिक विक्रम असल्याचा दावा आयोजक महेश भोकरे यांनी केला आहे.