सांगली- वाळवा तालुक्यातील कोल्हापूर पोलीस चेकपोस्टमुळे कणेगाव ते तांदुळवाडीपर्यंत ट्रक व चारचाकी गाड्यांची रांग लागलेली असते. तर चारचाकी गाड्यांना चेकिंगला वेळ लागत असल्याने कणेगावमध्ये व रस्त्याच्याकडेला अन्न पदार्थ व पाण्याच्या रिकाम्या बाटल्याचा खच पडत आहे. कणेगाव येथे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीवर हा चेकपोस्ट सुरू करण्यात आला आहे.
कणेगाव फाट्यावरील कोल्हापूर चेक पोस्ट हलवण्याची नागरिकांची मागणी - corona update kolhapur
कणेगाव येथे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीवर हा चेकपोस्ट सुरू करण्यात आला आहे. चारचाकी गाड्यांना चेकिंगला वेळ लागत असल्याने कणेगावमध्ये व रस्त्याच्या कडेला अन्न पदार्थ व पाण्याच्या रिकाम्या बाटल्याचा खच पडत आहे.
याठिकाणी प्रवाशी गाडीतून उतरून पिण्याचे पाणी मागण्यासाठी आजूबाजूच्या घरी जातात. त्यामुळे कणेगावच्या नागरिकांना कोरोनाच्या संसर्गाची शक्यता भासू लागली आहे. यामुळे कणेगाव ग्रामपंचायतीकडून सरपंच विश्वास पाटील तंटा मुक्तअध्यक्ष सुभाष पाटील तसेच राष्ट्रीय आपत्कालीन दक्षता समितीने तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवदेन दिले आहे.
कणेगाव फाट्यानजीक होणारा कचरा उचलला जाणे गरजेचे आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी किंवा अन्य जबाबदार अधिकारी यांच्याकडे या परिसरात औषध फवारणी करण्याबाबत, परिसरात स्वच्छता राखणेबाबत चर्चा करण्यात यावी. तसेच चेक पोस्टवर थांबलेल्या वाहनातून प्रवाशांना खाली न उतरण्याच्या सुचना देण्यात याव्यात. हे चेकपोस्ट कोल्हापूर जिल्हा हद्दीत स्थलांतरीत करण्यात यावे, असे निवेदनात नमूद केले आहे.
सद्या मुंबई पुण्यावरून मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. तपासणीसाठी चेक पोस्ट वर तीन किलोमीटर लांब रांगा लागत असतात. यामुळे प्रवाशी गाडीतून उतरून गावातून फिरत असतात. तर चेक पोस्टला चुकवून आड मार्गाने जाण्यासाठी बाहेरील लोक कणेगावात प्रवेश करत असल्याने नागरिकांना कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे कोल्हापूर पोलिसांचे चेकपोस्ट त्यांच्या हद्दीत हलवावे, अशी मागणी कणेगावातील नागरिक करत आहेत.