सांगली - कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय प्रकरणी महारयत अॅग्रो कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. म्हणून कंपनीच्या संचालकांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी इस्लामपूरमध्ये आसूड मोर्चा काढण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर पोलीस ठाण्यावर हा मोर्चा निघाला. तर येत्या 13 तारखेपर्यंत कारवाई न झाल्यास कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दारात आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
'कडकनाथ' घोटाळा प्रकरण : सांगलीत स्वाभिमानी व प्रहार संघटनेचा आसूड मोर्चा
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायामध्ये जिल्ह्यातील इस्लामपूर येथील महारयत अॅग्रो कंपनीकडून राज्यात सुमारे पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आला आहे. सुमारे 8 हजार शेतकरी, सर्वसामान्य आणि बेरोजगार तरुणांनी कंपनीच्या कोंबडी पालन व्यवसायात दुप्पट-तिप्पट नफ्याच्या आमिषाला बळी पडले. म्हणून कंपनीच्या संचालकांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी इस्लामपूरमध्ये आसूड मोर्चा काढण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर पोलीस ठाण्यावर हा मोर्चा निघाला.
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायामध्ये जिल्ह्यातील इस्लामपूर येथील महारयत अॅग्रो कंपनीकडून राज्यात सुमारे पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आला आहे. सुमारे 8 हजार शेतकरी, सर्वसामान्य आणि बेरोजगार तरुणांनी कंपनीच्या कोंबडी पालन व्यवसायात दुप्पट-तिप्पट नफ्याच्या आमिषाला बळी पडले. यासाठी प्रत्येकी 75 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कंपनीकडून कोंबडी आणि अंड्यांची खरेदी होत नसल्याने हा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यात महारयतच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तर यावेळी महारयत अॅग्रोच्या संचालकांवर अटकेची कारवाई करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तर या घोटाळा प्रकरणी राज्य सरकारकडून 12 सप्टेंबर पर्यंत कारवाई न झाल्यास 13 सप्टेंबर रोजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूर येथील निवासस्थाना समोर आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा यावेळी स्वाभिमानी आणि प्रहार संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.