सांगली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी एकेरी उल्लेख केला होता. त्याच्या निषेधार्थ इस्लामपूरमध्ये शिवसेनेकडून शेलार यांच्या फोटोला जोडे मारून निषेध केला.
मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; आशिष शेलारांच्या फोटोला इस्लामपूरमध्ये जोडेमारो आंदोलन हेही वाचा -'महिला अत्याचारांच्या घटनेत टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवर होणार कारवाई'
यावेळी आशिष शेलार यांच्या फ़ोटो बॅनरला इस्लामपूर येथे शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार व कार्यकर्त्यांनी जोडोमारो आंदोलन करून जाहीर निषेध केला. तसेच यावेळी आशिष शेलार यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या.
यावेळी नगरसेवक शकील सय्यद, अंकुश माने, सागर मलगुंडे, घनश्याम जाधव, प्रताप खराडे, सुभाष जाधव आदी शिवसैनिक उपस्थित होते.