सांगली - रात कली एक ख्वाब मे आयी और गले का हार हुई... हिंदी चित्रपटातील गीत सध्या जयंत पाटील यांच्यामुळे चर्चेत आले आहे. कारण जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एका लग्न समारंभात गायलेले ही गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पाटील यांच्यातील गीतकार समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जयंत पाटलांचे गाणे सोशल मीडियावर व्हायरल - sangli viral news
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एका लग्न समारंभात गायलेले ही गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पाटील यांच्यातील गीतकार समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जयंत पाटली बनले गायक
काही दिवसापूर्वी एका लग्नसमारंभासाठी जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली होती. लग्नाच्या निमित्ताने संगीत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाटील यांनी या संगीत समारोहाला गाणी ऐकण्यासाठी बसणे पसंत केले. काही वेळाने फर्माईशीवरून जयंत पाटील यांनीसुद्धा संगीत समारोहामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि हिंदी चित्रपटातील एक प्रसिद्ध गीत असणाऱ्या रात कली एक ख्वाब में आयी और गले का हार हुई, हे गाणे गायले. ते हे गाणे गात असताना एका मोबाईलमध्ये ते चित्रित झाले आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले. पाटील यांच्यामधील गीतकारसुद्धा समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.