सांगली -जातीयवाद म्हणजे काय? ( Jayant patil on communalism Side effects ) आणि देशाची अर्थव्यवस्था कुठे चालली आहे? हे लोकांना समजावण्याची गरज असून, प्रचाराचे तंत्रही आता बदलले आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant patil talk at rashtravadi parisamwad yatra in vita ) यांनी व्यक्त केले. सांगलीच्या विटा येथे राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेप्रसंगी ते बोलत होते.
बोलताना मंत्री जयंत पाटील हेही वाचा -Sangli Corporation Annual Meeting : महापालिकेच्या महासभेत प्रचंड गदारोळ; राष्ट्रवादी विरोधात काँग्रेस, भाजपा एकवटली
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची 'परिवार संवाद' यात्रा सोमवारी सांगली जिल्ह्यामध्ये दाखल झाली. विटा ( Jayant patil in yatra vita) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थित ही यात्रा पोहचली. यानिमित्ताने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
..मग कशाला देतील कमळाला मतदान -यात्रेच्या निमित्ताने झालेल्या संवाद सभेत मंत्री जयंत पाटील यांनी, आज शाहू-फुले-आंबेडकर कोण होते? जातीयवाद म्हणजे काय? त्याचे परिणाम - दुष्परिणाम काय? हे लोकांना सांगणे गरजेचे आहे. त्याचबरोबर देशातील अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने चालली आहे? हे समजण्याची गरज आहे. आज नरेंद्र मोदींच्या काळात पेट्रोल 86 पैशांनी पुन्हा वाढले आहे. हे पण लोकांना सांगणे गरजेचे आहे. आणि आधीचे मनमोहन सिंग बरे होते, हे जनतेला पटवून दिले की, ते कशाला कमळाला मतदान करतील, असा विश्वास त्यांनी केला आहे.
प्रचाराचे तंत्र बदलले -प्रचाराचे तंत्र आता बदलले आहे. त्यामुळे, कोणत्याही निवडणुकीसाठी आपले सैन्य तैनात असायला हवे. त्याचबरोबर, लोकांशी किती संपर्क ठेवता, हे महत्वाचे झाले आहे. त्यामुळे, लोकांशी व्यक्तिगत जवळीक असणे गरजेचे आहे. या देशात इंदिरा गांधींचाही पराभव झाला होता. हे कधी विसरू नका. त्यामुळे, प्रयत्न करा, प्रयत्नार्थी परमेश्वर, असे सांगत कामाला लागा, असा सल्ला मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिला.
हेही वाचा -Karnataka ST Bus Seized For Compensation : अपघाताच्या नुकसान भरपाईसाठी कर्नाटक एसटीची बस जप्त