महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जयंत पाटील यांच्या मुलाचा शाही लग्न सोहळा, राष्ट्रवादीसह विविध पक्षनेत्यांची लावली हजेरी - Jayant Patil son Marriage

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाचा शाही लग्न सोहळा आज सांगलीच्या इस्लामपूर मध्ये पार पडला ( Jayant Patil son Marriage  ) आहे. या लग्न सोहळ्यासाठी दिग्गज नेत्यांनी हजेरी लावत नव दांम्पत्यास शुभ आशिर्वाद दिले. शुभेच्छा देण्यासाठी आणि शाही लग्न सोहळा अनुभवण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

weeding
जयंत पाटील

By

Published : Nov 28, 2022, 11:03 AM IST

सांगली :राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाचा शाही लग्न सोहळा आज सांगलीच्या इस्लामपूर मध्ये पार पडला ( Jayant Patil son Marriage ) आहे. या लग्न सोहळ्यासाठी दिग्गज नेत्यांनी हजेरी लावत नव दांम्पत्यास शुभ आशिर्वाद दिले. शुभेच्छा देण्यासाठी आणि शाही लग्न सोहळा अनुभवण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतीक पाटील यांचा शाही लग्न सोहळा : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांचा शाही लग्न सोहळा ( Jayant Patil son royal wedding ) रविवारी इस्लामपूर मध्ये पार पडला,शहरातल्या राजारामबापू साखर कारखान्याच्या राजाराम नगर पटांगणत लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता,सुमारे दोन लाखाहून अधिक लग्नासाठी पत्रिका देखील वाटत करण्यात आल्या होत्या. त्यादृष्टीने चोख,अशी व्यवस्था लग्नसोहळयासाठी आसन व्यवस्थेपासून भोजन व्यवस्थापर्यंत सर्व नियोजन करण्यात आले होते.स्वतः जयंत पाटील सकाळपासून या सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा घेत होते. या लग्नसोहळयाच्या निमित्ताने इस्लामपूर शहरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात ( Police deployed Islampur city ) आला.

आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादी नेते हजर

इस्लामपूर शहरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात :सायंकाळी साडे सहा वाजता वर प्रतीक पाटील आणि वधू अलिका किर्लोस्कर ( Prateek Patil and Alika Kirloskar ) यांची भव्य व्यासपीठावर डीजेच्या तालावर जोरदार एन्ट्री झाली.आणि मंगलाष्टकांच्या विधीनंतर वधू-वरांनी एकमेकांच्या गळ्यात हार घालताचा आतिषबाजीने आसमंत उजळुन निघाला होता.

आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादी नेते हजर : काँग्रेसचे नेते शरद पवार,विरोधी पक्ष नेते अजित पवार,कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज,खासदार उदयनराजे भोसले, माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील,माजी मंत्री बाळासाहेब देसाई,राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई,खासदार श्रीनिवास पाटील,विधानसभा सभापती नरहरी झिरवळ,माजी मंत्री फौजिया खान,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ,आमदार सचिन अहिर,खासदार धनंजय महाडिक,माजी मंत्री सदाभाऊ खोत,विधान परिषद, सभापती राहुल नार्वेकर,नितीन राऊत,खासदार संजयकाका पाटील, खासदार धैर्यशील माने,यांच्या सह आजी-माजी आमदार,खासदार आणि सामजिक,उद्योग,शैक्षणिक विवीध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित ( NCP leaders Attend wedding ) होते.

ABOUT THE AUTHOR

...view details