सांगली :राज्यात ओला दुष्काळ जाहीर करायला सरकार टाळाटाळ ( Government refrain from declaring wet drought ) करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( NCP state president Jayant Patil ) यांनी केला आहे. ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी आम्ही करतोय, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. ते सांगलीच्या आटपाडी या ठिकाणी बोलत होते. तसेच गुजरात निवडणुकीच्या तोंडावर हिंदु देवतांना मानतो, हे दाखवण्याचा केजरीवाल यांचा प्रयत्न असून नोटेवर हिंदू देवदेवतांचे फोटो लावण्याची केजरीवालांची सूचना स्वीकारणं एवढं सोपे नाही, असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
wet drought : ओला दुष्काळ जाहीर करायला सरकार टाळाटाळ करतंय - जयंत पाटील - overnment is reluctant to declare wet drought
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करायला सरकार टाळाटाळ करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( NCP state president Jayant Patil ) यांनी केला आहे. ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी आम्ही करतोय, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.
![wet drought : ओला दुष्काळ जाहीर करायला सरकार टाळाटाळ करतंय - जयंत पाटील जयंत पाटील](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16767237-thumbnail-3x2-patil.jpg)
हक्काचे पाणी कोणीही हिरावून घेऊ शकत नाही : सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे आयोजित केलेल्या शेतकरी अभ्यास मेळाव्याला संबोधित केले. आटपाडी भागात पाणी आले पाहिजे या मागणीसाठी अनेकांनी आयुष्यभर संघर्ष केला. मागच्या सरकारमध्ये आपण केलेल्या कामामुळे या लढ्याला आता थोड्याफार प्रमाणात यश आले आहे. या भागात हळूहळू पाणी पोहोचत आहे. जलसंपदा मंत्री असताना येथे पाणी मिळावे यासाठी बैठका घेतल्या, निर्णयांमध्ये फेरबदल केले. सर्व कायदेशीरबाबींची पूर्तता करून कृष्ण नदीतून टेंभू विस्तारित योजनेला जवळपास ८ टीएमसी अतिरिक्त पाणी मिळवले त्यामुळे या भागात पाणी पोहोचत आहे. आपल्या हक्काचे पाणी कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
पाण्याचा योग्य आणि जपून वापर व्हायला हवा :पाण्याच्या न्याय हक्कासाठी जो लढा आपण सर्वांनी उभारला होता त्यात एक मोठे यश मिळाले आहे. आता सर्व गावांना पाणी मिळाले आहे तर त्या पाण्याचा योग्य आणि जपून वापर व्हायला हवा. पाण्याची बचत करण्याचे गणित आपल्याला येत्या काळात बसवायचे आहे. त्यामुळे योग्य आणि समान पाणी आपल्याला मिळेल. शेती क्षेत्रात जगात काय सुरू आहे याची माहिती शेतकऱ्यांनी घ्यावी, त्याबाबत अभ्यास करावा. या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या मातीत कसा करता येईल यासाठी प्रयत्न करावा. मला विश्वास आहे की, जगाच्या पाठीवर आपला शेतकरी मोठी कामगिरी करू शकतो. असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.