सांगली - एकनाथ खडसे हे भाजपच्या असंतोषाचे जनक आहेत. खडसेसह अनेकजण भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेच्या नाराजीवर दिली आहे. येत्या 2 दिवसात मंत्री मंडळ खाते वाटप होईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जयंत पाटील प्रथमच त्यांचा मतदारसंघ इस्लामपूर येथे आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
एकनाथ खडसे हे भाजपमधील असंतोषाचे जनक - मंत्री जयंत पाटील - News about the BJP
शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंतराव पाटील हे इस्लामपूर मतदारसंघात रविवारी प्रथमच दाखल झाले. यावेळ मंत्री पाटील यांनी कासेगाव येथील राजरामबापू पाटील यांच्या स्मारकाला भेट देत, आशीर्वाद घेतले.
कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंतराव पाटील हे इस्लामपूर मतदारसंघात रविवारी प्रथमच दाखल झाले. यावेळ मंत्री पाटील यांनी कासेगाव येथील राजरामबापू पाटील यांच्या स्मारकाला भेट देत, आशीर्वाद घेतले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना खाते वाटप् लवकरच होईल. खातेवाटपाचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री यांचा आहे. मुख्यमंत्र्यांची सर्वांशी सल्लामसलत चालू आहे. त्यामुळे एक-दोन दिवसात खाते वाटपाचा निर्णय होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
भाजपावर एकनाथ खडसे नाराज असल्याच्या प्रश्नावर बोलताना ,एकनाथ खडसे हे भाजपच्या असंतोषाचे जनक आहेत. तसेच खडसेसह अनेकजण भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. खडसे नाराज आहेत, हे मी वाचले, पण त्यांचा पर्याय राष्ट्रवादी पक्ष असेल, यावर माझी त्याच्याशी अजून चर्चा झालेली नाही, असे मत जयंतराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.