महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आम्ही लोकशाही मानतो.. देशमुखांनी घेतलेला निर्णय योग्य - जयंत पाटील - जयंत पाटील

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर नाही. देशमुख यांनी स्वतः शरद पवार यांच्याकडे जाऊन चौकशी होणार असेल तर राजीनामा देतो अशी भूमिका घेत राजीनामा दिला आणि त्यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचं मत जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

jayant patil on anil deshamukh resignation
jayant patil on anil deshamukh resignation

By

Published : Apr 5, 2021, 8:16 PM IST

Updated : Apr 5, 2021, 8:23 PM IST

सांगली - गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर नाही. देशमुख यांनी स्वतः शरद पवार यांच्याकडे जाऊन चौकशी होणार असेल तर राजीनामा देतो अशी भूमिका घेत राजीनामा दिला आणि त्यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचं मत जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

लोकशाही मानणारी राष्ट्रवादी -

तसेच मंत्री जयंत पाटील म्हणाले, अनिल देशमुख यांनी घाईगडबडीत राजीनामा दिलेला नसून राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाहीची बूज राखणारा पक्ष असून देशमुख यांनी अशा पद्धतीचा एखादा आरोप आणि त्यांची चौकशी होणार असेल तर आपण स्वतःहून राजीनामा देण्याची भूमिका व्यक्त केली आहे, मला वाटतं त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे आणि चौकशी मध्ये काय बाहेर निघेल, त्यानंतर त्यांच्यावर पुनर्विचार करता येऊ शकतो,असं मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

जयंत पाटील पत्रकार परिषदेत बोलताना
गृहमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतली..
आता गृहमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री हेच निर्णय घेतील आणि तिन्ही पक्षांना तो मान्य असेल, तसेच आपल्या गृहमंत्री पदाबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलणे हे मला उचित वाटत नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट करत, शरद पवार साहेबांना मला जे काही सांगायचं आहे, ते मी सांगेन, मात्र उगाच गृहमंत्री पदाबाबत संभाव्य भाष्य करने योग्य ठरणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
सीबीआय पक्षपातीपणे चौकशी करेल -
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले टिकेकर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, आता न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्याच्यावर शक्यतो भाष्य करायचं नसतं आणि त्यामुळे मी त्यावर बोलत नाही. पण सीबीआयने चौकशी केल्यानंतर या बाबतीत बरेच खुलासे पुढे येतील आणि मला खात्री आहे सीबीआय पक्षपातीपणे चौकशी करेल. तसेच मागील 2-4 वर्षाचीही चौकशी करेल आणि असेप्रकार पूर्वी होत होते का ? हे तपासले जाईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. असं मत मंत्री पाटील यांनी व्यक्त केले आहे.
वाझे आणि परमबीर यांच्यात अधिक संपर्क -
सचिन वाझे यांनी एनआयए कोठडीत दिलेल्या कबुली जबाबावरून विचारले असता, सचिन माझे हे गेल्या 17 वर्षांपासून सेवेत नव्हते मात्र काही काळात ते सेवेत आले आहेत. या काळात त्यांचा संपर्क हा तत्कालीन माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी आलेला आहे,असे मत मंत्री पाटील यांनी व्यक्त केले आहे.
Last Updated : Apr 5, 2021, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details