महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत लवकरच उभे राहणार 400 खाटांचे कोरोना रुग्णालय - पालकमंत्री जयंत पाटील - सांगली कोरोना रुग्णालय न्यूज

सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुलाच्या बाजूला कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी 400 खाटांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाला या रुग्णालयाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यावर लवकरच निर्णय होऊन त्याचे काम सुरू होईल, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

Jayant Patil
जयंत पाटील

By

Published : Aug 15, 2020, 2:16 PM IST

सांगली - कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सांगलीमध्ये 400 घाटांचे रुग्णालय उभारणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री व सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणानंतर माध्यमांनी त्यांनी ही माहिती दिली.

सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुलाच्या बाजूला कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी 400 खाटांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाला या रुग्णालयाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यावर लवकरच निर्णय होऊन त्याचे काम सुरू होईल, असा विश्वासही पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे गरज नसताना घराच्या बाहेर पडू नये. कोरोनापासून दूर राहण्यासाठी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे. कोरोना नियंत्रणासाठी शासकीय यंत्रणा गेल्या काही महिन्यापासून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. हे नेहमीचे व साधारण संकट नाही. या संकटाच्या काळात सर्वांनी संयम राखून प्रशासकीय काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना साथ देणे गरजेचे आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, माध्यमांचे प्रतिनिधी यांनीही या संकटाच्या काळात अतिशय चांगले काम केले आहे, असे पाटील म्हणाले.

आरोग्य विभागाने 50 वर्षावरील व दुर्धर आजार असलेल्या नागरिकांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यांची वारंवार तपासणी करून त्यांना काही अडचणी आहेत, का हे पाहण्याचे काम आरोग्य यंत्रणा करत आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details