सांगली- पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच सुरू झालेला आष्टा येथील केळी सौद्याचा बाजार, केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्यासाठी आधार देणारा ठरेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. आष्टा येथील केळी सौद्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
जयंत पाटलांच्या हस्ते केळ्यांचे सौदे
केळी उत्पादक शेतकरयांनी स्पर्धात्मक दर मिळावा यासाठी इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आष्टा उपबाजार समिती आवारात "केळी सौदे"सुरू करण्यात आले आहेत. सांगली कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये पंढरपूर वगळता केळी सौद्याचा बाजार कुठेही नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळ्यांचा दर मिळण्यामध्ये मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते, ही बाब लक्षात घेऊन इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आष्टा या ठिकाणी बाजार समितीच्या आवारात केळी सौदे सुरू करण्यात आलेले आहेत. राज्याचे जलसंपदा व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते यावेळी सौद्याचा शुभारंभ पार पडला आहे.