महाराष्ट्र

maharashtra

इस्लामपूरच्या कोरोना रुग्णावरून होणाऱ्या 'त्या'आरोपांचे पालकमंत्री जयंत पाटीलांकडून खंडन

By

Published : Apr 1, 2020, 3:13 PM IST

माझ्याविरोधातील काही स्थानिक राजकारण्यांना घेऊन मला व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बदनाम करण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा आरोप मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्यां विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

jayant-patil-denies-all-allegations-regarding-islsampur-corona-cases
इस्लामपूरच्या कोरोना रुग्णावरून होणाऱ्या 'त्या'आरोपांचे पालकमंत्री जयंत पाटीलांनी केले खंडन

सांगली- इस्लामपूर येथील कोरोना बाधित कुटुंबाला दिल्लीतुन सोडण्यात आपला कसलाही संबंध नसून केवळ राजकीय हेतून मला व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बदनाम करण्याचा काहींचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.तसेच समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्यां विरोधात आपण तक्रार दाखल करणार असल्याचेही मंत्री यांनी स्पष्ट केले आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

इस्लामपूरच्या कोरोना रुग्णावरून होणाऱ्या 'त्या'आरोपांचे पालकमंत्री जयंत पाटीलांनी केले खंडन

सांगलीच्या इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील 25 जणांना कोरोना लागण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. इस्लामपूर शहरातील त्या कुटुंबातील चौघेजण उमराह देवदर्शनासाठी सौदी अरेबियाला गेले होते. त्यानंतर ते 12 मार्च रोजी दिल्लीमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर ते 14 मार्चला इस्लामपूर मध्ये परतले होते. मात्र, 14 ला त्यांच्यावर क्वारंनटाईनचे शिक्के मारलेले असताना देखील जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फोन केल्याने तेथील पोलिसांनी त्यांना सोडून दिल्याचा आरोप व्होक लिबरल या ट्विटर हँडलवरून करण्यात आला होता, त्यामुळे सोशल मीडियामधून याबाबत जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका झाली होती.

मंत्री जयंत पाटील यांनी या सर्व प्रकरणाचा आज खुलासा केला आहे. सर्व आरोपांचे त्यांनी खंडन केले आहे. कोरोनाबाधित इस्लामपूरात कधी दाखल झाले याची मला कल्पनाही नाही. त्यांच्या टेस्ट ज्यावेळी पॉझिटीव्ह निघाल्या तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी इस्लामपूरात ४ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आपणाला कळवले, असल्याचे पाटील यांनी सांगितले.

आज कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी सर्व जण लढत आहेत.आम्ही सर्वांची काळजी घेत आहोत, तेव्हा कृपा करून अशा परिस्थितीत तरी कुणी असे खालच्या पातळीचे राजकारण करू नये.असेही आवाहन जयंत पाटील केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details