सांगली -संभाजी भिडे यांनी जे शब्द वापरले ते पाहता, सर संघचालक मोहन भागवत यांना कोरोना झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांना देखील कोरोना झाला होता, अश्या शब्दात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. जयंत पाटील सांगली मध्ये बोलत होते.
भिडेंचे वक्तव्य निषेधार्ह, 'त्या' विधानाची चौकशी झाली पाहिजे - जयंत पाटील भिडेंच्या विधानाची चौकशी झाली पाहिजे-पुढे मंत्री पाटील म्हणाले, आज सगळ्यांनाच कोरोना झाला आहे. अश्या परिस्थिती हे बोलणे चुकीचे आहे. अशी वक्तव्य करणे लोकांना वेगळ्या दिशेला लावणे. समाजात अशी विधाने बाधा करतात. अश्या विधानाची चौकशी करणे गरजेचे आहे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. हे संकट असुन त्याचे गांभीर्य घालवणे हे योग्य नाही, कायद्याच्या दृष्टीने हे गंभीर आहे. याची चौकशी होईल, अशी मला अपेक्षा आहे. तसेच अशी धाडसी विधान ते परत करणार नाहीत,असेही पाटील म्हणाले.
कोरोना हा अस्तित्वात नाही. अस्तित्वात नसलेले काळे मांजर काळ्या कुट्ट अंधारात शोधण्यासारखे या रोगाचा प्रकार सूरू आहे. तर कोरोना, कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे. प्रत्येक जण आपापल्या जीवाची काळजी घेईल, सरकारने यात लक्ष घालू नये. सरकारने पारदर्शक कारभार करावे. लॉकडाऊनची गरज नाही. तसेच सरकारने व्यसने वाढवायचे काम चालू केले आहे का? असा सवाल करत गांजा, मटका, अफू ओढणारे सगळे मोकाट, पण तालमी, मैदान बंद हे कसे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
काय म्हणाले होते भीडे-
मास्कबाबत बोलताना कोणत्या नालायकाने मास्क घालण्याचे सिद्धांत काढला आहे, मास्क लावण्याची गरज नाही. तसेच मास्क नसला की पोलीस काठ्या मारतात हा मूर्खपणा आहे. तसेच कोरोनाच्या नावाखाली देशात-राज्यात खेळखंडोबा सुरू आहे. कोरोनाबाबत केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असून प्रत्येकाला आपल्या जिवाची काळजी असून जे जगायचे ते जागतील. जे मारायचे ते मारतील, असे मत भिडे यांनी व्यक्त केले होते.
कोरोना घालवण्यासाठी छत्रपती शिवाजी-संभाजी महाराजांचे आदर्श ठेवून राज्य केले पाहिजे. नोटावरचे गांधी आदर्श मानून कारभार केल्यास हा कोरोना असाच वाढत राहील. केवळ कोरोना-कोरोना आक्रोश चालले आहे. कोरोना अस्तित्वात नाही. त्यामुळे-लॉकडाऊनची गरज नाही. यामुळे सरकारने काही करू नये. ज्याला-त्याला आपल्या जीवावर सोडून द्यावे, असे भिडे म्हणाले होते.
हेही वाचा-'लसीकरण केंद्रे बंद असताना लस महोत्सव साजरा करता?'