महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र नियम पाळा; जयंत पाटलांचे सांगलीकरांना आवाहन - सांगली लॉकडाऊन अफवा

सांगली जिल्हा पुन्हा लॉकडाऊन होणार, अशी जोरदार चर्चा सगळीकडे सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून सांगली जिल्हा शंभर टक्के लॉकडाऊन होणार असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील आणि सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांचा हवाला देऊन सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संभ्रम आहे.

Jayant Patil
जयंत पाटील

By

Published : Jul 18, 2020, 2:46 PM IST

सांगली - तूर्तास सांगली जिल्हा लॉकडाऊन करण्याचा विचार नसल्याचे जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा 21 ते 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात येणार, या आशयाचा एक संदेश जयंत पाटील आणि जिल्हाधिकाऱयांच्या नावाने सध्या व्हायरल होत आहे. याबाबत जयंतराव पाटील यांनी लॉकडाऊन होणार नसल्याचा खुलासा केला आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा खरोखर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही मंत्री पाटील यांनी दिला आहे.

सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात विशेषत: सांगली महानगरपालिका क्षेत्रात सर्वात जास्त रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे सांगली जिल्हा पुन्हा लॉकडाऊन होणार, अशी जोरदार चर्चा सगळीकडे सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून सांगली जिल्हा शंभर टक्के लॉकडाऊन होणार असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील आणि सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांचा हवाला देऊन सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संभ्रम आहे.

ही बाब पालकमंत्री जयंतराव पाटील यांना समजताच त्यांनी खुलासा दिला आहे. सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याचा सध्या तरी विचार नाही. त्यामुळे अशा कोणत्याही बातम्यांवर, अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले आहे. मात्र, सोशल डिस्टंन्सिंग आणि इतर नियमाचे उल्लंघन आणि अनावश्यक गर्दी वाढत असल्याचे निदर्शनास आल्यास लॉकडाऊन केले जाईल, असा इशारा जयंत पाटील यांनी सांगलीतील जनतेला दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details