महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 27, 2021, 8:38 PM IST

ETV Bharat / state

चक्क दुचाकीने जाऊन जत तहसिलदारांची वाळू माफियांवर धडक कारवाई

तहसीलदारांनी चक्क मोटरसायकलने जाऊन वाळू माफियांवर कारवाई केली आहे. जत तालूक्यातील कोरडा नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी पाण्याची पातळी कमी होत आहे.

Jat Tahsildar action on Sand Mafia
जत तहसिलदारांची वाळू माफियांवर धडक कारवाई

सांगली- जत तालुक्याच्या तहसिलदारांनी दुचाकीने जात सिंगनहळ्ळी येथील कोरडा नदीपात्रात अवैध वाळू उपसा प्रकरणी कारवाई केली आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री प्रांताधिकारी प्रशांत आवटे याच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सचिन पाटील यांच्या पथकाने केली आहे. कारवाईत जेसीबी, तीन टेम्पो, एक डंपर ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

तहसीलदारांनी चक्क मोटरसायकलने जाऊन वाळू माफियांवर कारवाई केली आहे. जत तालूक्यातील कोरडा नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी पाण्याची पातळी कमी होत आहे. नदी पात्राच्या बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान होत आहे. तहसिलदार सचिन पाटील यांनी वाळू तस्करांना लक्षात येऊ नये, म्हणून शुक्रवारी रात्री दुचाकीने प्रवास करत वाळू उत्खनन करणाऱ्या ठिकाणी छापा टाकला.

हेही वाचा-होय, शरद पवार माझा बापच - चित्रा वाघ

ही कारवाई प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सचिन पाटील, मंडळ अधिकारी नंदकुमार बुकटे, प्रशांत बुचडे, तलाठी दुष्यंत पाटील, विशाल उदगिरे, राजेश चाचे, निखिल पाटील , अनिल हिप्परकर, स्वप्नील घाडगे , अभिजित सोंनपुराते, बागलवाडीच्या सरपंच लक्ष्मी खांडेकर, कोतवाल प्रवीण काळे व स्थानिक पोलीस पाटील यांनी केली आहे.


हेही वाचा-माध्यमांनी पूजा चव्हाणच्या कुटुंबियांची बदनामी थांबवावी- अ‌ॅड संगीता चव्हाण

सापळा रचून वाहने ताब्यात

वाळू उत्खनन करणाऱ्या ठिकाणी जेसीबी दिसून आला. वाळू तस्करी विरोधी पथक आल्याचे समजताच वाळू तस्करांनी वाहने चोरट्या मार्गाने पळविले. बेकायदेशीरपणे वाळू भरलेला डंपर वेगाने जात होत होता. सिंगनहळ्ळी येथील महादेव मंदिराजवळ डंपरला वळसा न बसल्याने डंपर जागीच पलटी झाला. या डंपरमध्ये तीन ब्रास वाळू भरली होती. याचा पंचनामा करण्यात आला आहे. थोड्याच अंतरावर मोहन खिलारे यांच्या मालकीचे व वापरात असणारे टेम्पो एका घराच्या पाठीमागे सापडला आहे. काही अंतरावर असलेले हनमंत खिलारे, मोहन खिलारे यांचे टेम्पोदेखील ताब्यात घेऊन जत पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले आहे. जप्त केलेल्या वाहनांना सुमारे आठ लाख दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. वाळू उत्खनन केलेल्या ठिकाणी मोजमापे घेऊन दंडाची रक्कम निश्चित केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली आहे. महसूल प्रशासनाची पहाटेपर्यंत कारवाई सुरुच होती.

ABOUT THE AUTHOR

...view details