सांगली - जत तालुक्यातील जिरल्याळ या गावात लॉकडाऊन सुरू असतानाही बेकायदेशीररित्या दारू विक्री करणाऱ्या विकास गुंडप्पा सनदी, राहणार बेळगी तालुका मिरज, शिवराज लोंढे ,राहणार जाडर बोबलाद तालुका जत या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. देशी टँगो कंपनीचे १३ बॉक्स, एका बॉक्स मध्ये ४८ बाटल्या एका बाटलीचे दर ५२ रुपये, तसेच एक चार चाकी गाडी,(मारुती शिफ्ट गाडी नंबर एम.एच ०२.ए.एपी ८८०८) असा विना परवाना दारूचा दीड लाखांचा मुद्देमाल जत पोलिसांनी जप्त केला आहे.
संचारबदीतही जत तालुक्यात दारू विक्री;दिड लाखांचा मुद्देमाल जप्त - corona effect
जत तालुक्यातील जिरल्याळ या गावात लॉकडाऊन सुरू असतानाही बेकायदेशीररित्या दारू विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांच्याकडून विना परवाना दारूचा दीड लाखांचा मुद्देमाल जत पोलिसांनी जप्त केला आहे.
ग्राहकांच्या मागणीनुसार दारू दुप्पट ते तिप्पट भावाने विकण्यात येत होती. सदर प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून, एकूण दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल महेश मुळीक यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता संपूर्ण देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडून नये असे, प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे.
अत्यावश्यक वस्तुची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. मात्र,जत तालुक्यात जीरग्याळ या गावात गाडीतून विना परवाना वाहतूक सुरू होती. दारू घेणाऱ्यांची माहिती जत पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी पेट्रोलिंगच्या पोलिसांना संपर्क करून त्या ठिकाणी पाठवले. अवैधरित्या दारू वाहतुक करणाऱ्या ठिकाणी छापा टाकत तब्बल दिड लाखांहून अधिक रुपयाचे देशी दारू आणि मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.