जतमध्ये दोन चंदनतस्कर पोलिसांच्या ताब्यात, सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त - jath police news
जत पोलिसांनी शेगाव येथे चंदनाची वाहतूक करणाऱ्या दोघांना चंदन शनिवारी रात्री ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चंदन व दुचाकी, असा एकूण एक लाख 49 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जत (सांगली) - तालुक्यातील शेगाव येथे चंदनाची वाहतूक करणाऱ्या दोघांना जत पोलिसांनी शनिवारी (दि. 21 नोव्हेंबर) रात्री ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चंदनाचे दोन तुकडे व दुचाकी, असा एक लाख 49 हजार 90 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी राजू चन्नाप्पा भोसले (वय 32, रा. पंढरपूर), सिताराम बळिराम चंदनवाले (वय 19, रा. रोपळे, ता. पंढरपूर) यांना ताब्यात घेतले आहे.
शेगाव स्टॅण्डनजिक दोन चंदन तस्कर चंदनाचे तुकडे विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार जत पोलीसाच्या पथकाने सापळा लावून त्यांना दुचाकीसह ताब्यात घेतले.त्यात 52 हजार 850 रूपये किंमतीचे 15 किलो 100 ग्रँम,व 66 हजार 150 रूपयांचे 18 किलो 900 ग्रॅम, असे दोन चंदनाचे ओबड,धोबड तुकडे आढळून आले.
त्याचबरोबर 30 हजार रूपये किंमतीची दुचाकी (एम एच 13 बी वाय 7805) ,एक कुऱ्हाड, एक वाकस, असे 1 लाख, 49 हजार 90 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.