महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jayant Patil : जयंत पाटलांना न्यायालयाचे वॉरंट, स्वतः कोर्टात हजर राहून मिळवला जामीन.. - granted bail to Jayant Patal

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( NCP state president Jayant Patil ) यांना इस्लामपूर न्यायालयाकडून वॉरंट ( Islampur Court ) बाजवण्यात आले होते. वारंवार समन्स देवूनही न्यायालयात हजर न राहिल्याने वारंट काढले होते. मात्र, जयंत पाटलांनी न्यायालयात हजर राहून वॉरंट रद्द करत जामिन मिळवला आहे.

Jayant Patal
जयंत पाटील

By

Published : Jul 22, 2022, 11:01 PM IST

सांगली -राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( NCP state president Jayant Patil ) यांना इस्लामपूर न्यायालयाकडून वॉरंट बाजवण्यात आले होते. मात्र, जयंत पाटलांनी न्यायालयात हजर राहून वॉरंट रद्द करत जामिन मिळवला आहे. जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पाच वर्षापुर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार समन्स देवूनही न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांना वारंट काढले होते. राजकीय जीवनात प्रथमच त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून त्यांना जामीनासाठी स्वतः न्यायालयात हजर राहण्याची वेळ आली आहे.

न्यायालयात हजर राहून वारंट रद्द -2017 साली सांगली जिल्हा परिषद ( Sangli Zilla Parishad ) निवडणूकीवेळी आमदार जयंत पाटील यांनी शिगाव येथे रस्त्यावरच ठिय्या मारला. दरम्यान जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आष्टा पोलिसात आमदार जयंत पाटील यांच्यासह स्वरुपराव पाटील, मधुकर पाटील, रणजित पाटील,शरद गायकवाड, मोहन गायकवाड, राजेंद्र भासर, विलासराव शिंदे, जितेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी इस्लामपूर न्यायालयात ( Islampur Court ) खटला सुरू आहे. मात्र, सदर खटल्याकामी वारंवार समन्स देवूनही न्यायालयात हजर न राहिल्याने आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात वॉरंट काढण्यात आला होते. दरम्यान शुक्रवार 22 जुलै रोजी दुपारच्या सुमारास आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर न्यायालयात हजर राहून वारंट रद्द करत जामीनाची पुर्तता केली आहे.


हेही वाचा -Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंचं बंड, उद्धव ठाकरे रणांगणांत; शिवसेनेच्या बांधणीसाठी 20 दिवसांत 13 बैठका

ABOUT THE AUTHOR

...view details