महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इस्लामपूरच्या 'त्या' पहिल्या चार कोरोनामुक्त रुग्णांची रुग्णालयातून इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये रवानगी

सौदी अरेबियातून परतलेल्या सांगलीच्या इस्लामपूर येथील चार जणांना कोरोना लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळच्या २५ जणांना कोरोना लागण झाली होती. त्यामुळे संपूर्ण राज्य हादरून गेले होेते. त्यापैकी जे पहिले चार कोरोनाबाधित रुग्ण आहेत. ते मात्र, कोरोनामुक्त झाले आहेत.

islampur covid 19 free patient
इस्लामपूरच्या 'त्या' पहिल्या चार कोरोनामुक्त रुग्णांची रुग्णालयातून इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये रवानगी

By

Published : Apr 7, 2020, 11:43 PM IST

सांगली - इस्लामपूरच्या पहिल्या चार कोरोनाग्रस्त रुग्णांची कोरोनातून मुक्तता झाली आहे. त्यामुळे त्यांना कोरोना रुग्णालयातून इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये रवानगी करण्यात आली आहे. तर अन्य २२ कोरोनाग्रस्तांची रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय साळुंखे यांनी दिली आहे. तर सध्याच्या घडीला सांगलीच्या इस्लामपूरमधील कोरोना रुग्णांचा आकडा हा २२ वर असल्याचे साळुंखे म्हणाले.

सौदी अरेबियातून परतलेल्या सांगलीच्या इस्लामपूर येथील चार जणांना कोरोना लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळच्या २५ जणांना कोरोना लागण झाली होती. त्यामुळे संपूर्ण राज्य हादरून गेले होेते. कोरोनाबाधित रुग्णांच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यापकी जे पहिले चार कोरोनाबाधिता रुग्ण आहेत. त्यांचा १४ दिवसांचा उपचाराचा कार्यकाळ संपल्याने तपासणी करण्यात आली होती. दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्यामुळे कोरोना रुग्णालय प्रशासनाकडून त्या पहिल्या चार कोरोनाबाधित रुग्णांना कोरोना मुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, त्यांची रवानगी ही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये करण्यात आली आहे. त्या ठिकाणी आणखी काही दिवस त्यांना ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details