महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीतील इस्लामपूर ३ दिवस बंद राहणार; अत्यावश्यक सेवाही वगळल्या - कोरोना

इस्लामपूरमद्ये विषम तारखेला मेडिकल सुरू ठेवली जाणार आहेत. बाहेरून सुरक्षा यंत्रणा मागवून घेण्याविषयी तीन दिवसांनी पुढे काय निर्णय घ्यायचा हे नंतर ठरवले जाणार आहे. शहरातील बॅंका, पतसंस्था यांनीही या तीन दिवसात व्यवहार बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे.

islampur city lockdown for 3 days even essentail services barred
सांगलीतील इस्लामपूर ३ दिवस बंद राहणार; अत्यावश्यक सेवाही वगळल्या

By

Published : Mar 28, 2020, 7:12 PM IST

सांगली- कोरोनाने सांगली शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढल्याने प्रशासन महत्त्वाचे निर्णय घेत आहे. इस्लामपूर येथे 29 ते 31 मार्चदरम्यान शहरात नागरिकांना दूध, किराणा दुकान काहीही उपलब्ध राहणार नाही. इस्लामपूर शहर सलग तीन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय नगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

एक आड एक दिवस विषम तारखेला मेडिकल सुरू ठेवली जाणार आहेत. बाहेरून सुरक्षा यंत्रणा मागवून घेण्याविषयी तीन दिवसांनी पुढे काय निर्णय घ्यायचा हे नंतर ठरवले जाणार आहे. शहरातील बॅंका, पतसंस्था यांनीही या तीन दिवसात व्यवहार बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे.

नगराध्यक्ष निशिकांत पाटील, तहसीलदार रविंद्र सबनीस, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी नागेश पाटील म्हणाले, संभाव्य गरज ओळखून इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन करण्यासाठी आणखी पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे. 4000 लोकांना प्रत्यक्ष भेटून माहिती घेतली जात आहे. सर्वेक्षणाची व्याप्ती वाढवत आहोत. दुबार करावे लागले तरीही सर्व्हे होईल. बफर झोनमध्ये हातावर शिक्के मारतोय, पुढील तीन महिने त्यांना बाहेर पडता येणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मेडिकल सुरू न ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, त्यांचे परवाने रद्द करू. ठराविक क्षेत्रात बंधने लादली जातील. तहसीलदार सबनीस म्हणाले, बाहेरच्या सुरक्षा यंत्रणेची गरज नाही. नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात अलर्ट राहावे. संपर्क यंत्रणा उभारावी. हेल्पलाईनशी संपर्क साधावा. कोरोनाविरोधात सर्वांनी एकीने सामना करूया. प्रादुर्भाव मर्यादीत ठेवणे हेच आपले प्राधान्य राहावे.निशिकांत पाटील म्हणाले, शहरावर मोठी आपत्ती आलीय, शहराविषयी अत्यंत वाईट चर्चा सुरुय. कोरोनाबधित लोकांच्या जवळपास 400 लोक संपर्कात आले आहेत. शहरातील साडेतीन किलोमीटर अंतरावर सील करण्यात आला आहे. 11 हजार लोकसंख्या बंदिस्त केली आहे. 27 इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले आहेत.

सर्व्हे करणाऱ्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना मास्क नाहीत, औषधे नाहीत. त्यांना तातडीने उपलब्ध करुन द्यावेत. 80 हजारांच्या लोकसंख्येच्या शहराला सुविधा निर्माण करून दिल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. काही लोकांमध्ये अद्याप कसलीच जाणीव नाही, तेच लोक बाहेर पडत असल्याचे नारायण देशमुख यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details