महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नो शक्ती प्रदर्शन,नो कार्यकर्ते, अशा माहोलात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगलीतील इच्छुकांच्या मुलाखती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाकडून उमेदवारांना कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता, केवळ मुलाखती देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही काही उमेदवारांनी कार्यकर्त्यांना घेऊन शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी मागितल्याचे अभिमानाने सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती

By

Published : Jul 24, 2019, 10:21 PM IST

सांगली- जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. 19 जणांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. फारसा गाजावाजा न करता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामुळे नो शक्ती प्रदर्शन, नो कार्यकर्ते अशा वातावरणात पार पडलेल्या मुलाखतींना, राष्ट्रवादी नेत्यांनी मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले.

सुरेश घुले, पक्ष निरीक्षक, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्ह्यातील विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज सांगलीमध्ये पार पडल्या. पक्षाच्या कार्यालयात माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, सांगली जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील या नेत्यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखती घेतल्या.

पलूस-कडेगाव मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, शिराळा विधानसभा मतदारसंघातून मानसिंगराव नाईक आणि तासगाव-कवठेमंहाकाळ मतदारसंघातून आमदार सुमनताई पाटील या चौघांनी तर इतर चार मतदारसंघातुन 15 जणांनी असे एकूण 19 जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. तर सांगली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विनया पाठक यांनी एकमेव उमेदवारी मागितली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या यापूर्वी विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती प्रसंगी प्रत्येक मतदारसंघातून दिग्गज नेत्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांची उमेदवारी मागणीसाठी भाऊगर्दी व्हायची. विशेष म्हणजे मुलाखतीच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे जत्रेचे स्वरूप प्राप्त व्हायचे. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची ? असा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या समोर पेच निर्माण व्हायचा. पण यावेळी घेण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीवेळी अशी स्थिती जाणवली नाही. तुरळक प्रमाणात गर्दी दिसून आली, ना कोणती घोषणाबाजी, ना कार्यकर्त्यांची गर्दी, अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details