सांगली - दरोडे आणि घरफोडी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला चांगल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. चार जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. तर या दरोडेखोरांकडून 23 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर या टोळीकडून महाराष्ट्रात अनेक दरोडे टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दरोडे आणि घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद मध्यप्रेदशमधील टोळीला अटक..महाराष्ट्रात घरफोडी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला सांगली पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले. मध्यप्रेदशमधील चार जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. केरमसिंग मेहडा (वय 30), उदयसिंग मेहडा (वय 23), गुडया उर्फ गुडीया मेहडा ( वय 20) व एक विधीसंघर्ष बालकाचा समावेश आहे. हे सर्व जण मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यातील कुक्षी तालुक्यातील आहेत. सांगलीच्या अहिल्यानगर याठिकाणी दरोडा टाकल्यानंतर चौघांना गुन्हे अन्वेषण शाखेने यावेळी अटक केली आहे. तर एक जण यावेळी फरारी झाला आहे. या संस्थेत दरोडेखोरांकडून चोरीतील 23 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील गुन्हे उघडकीस..या टोळीकडून सांगली बरोबरच सातारा, कोल्हापूर, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण येथील घरफोड्या उघडकीस येण्यास मदत होणार आहे. राज्यात पुण्यासह अनेक जिल्ह्यात या टोळीने धुमाकूळ घातला होता.अहिल्यानगर येथे घरफोडी केल्यानंतर एलसीबीच्या पथकाने पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीत यंत्रणा राबवून टोळीला पकडले. या टोळीने यापूर्वी इस्लामपूरमध्ये तीन घरे फोडली आणि सांगलीत देखील घरफोडी केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना सांगीतले आहे.