सांगली- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २५ लाख लुटी प्रकरणी सांगली पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीस अटक केली आहे. पंजाबमधून दोघांसह एकून ४ जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या लुटीचा मुख्य सूत्रधार हा बँकेचा कर्मचारी असल्याचे उघडकीस आले आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव तालुक्यातील विसापूर शाखेतून २५ लाखांची रोकड लपास करण्यात आली होती. शाखेतील कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात चटणी टाकून ही रक्कम लपास करण्यात आली. ही घटना १२ जून रोजी घडली होती. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. तर या चोरीचा छडा लावण्याचे मोठे आव्हान सांगली पोलिसांसमोर होते.