महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे 43 वे वर्ष - हिंदू मुस्लिम बांधव मशिदीमध्ये गणपती प्रतिष्ठापणा

झुंजार चौकातील न्यू गणेश तरुण मंडळाची स्थापना 1980 मध्ये झाली आहे. त्यानंतर एका गणेशोत्सव दरम्यान प्रंचड पाऊस झाला. त्यावेळी तेथील मुस्लिम बांधवानी गणेश मूर्ती भिजू नये,म्हणून गणेश मूर्ती मशिदीच्या आतील बाजूला ठेवली आणि त्यानंतर मशिदीमध्ये गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा सुरू झाली. त्यानंतर गेल्या 43 वर्षांपासून या ठिकाणी मशिदीत गणपती बसवण्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे.

installation of lord ganesha in mosque 43rd year of hindu muslim unity in sangli
मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना

By

Published : Sep 8, 2022, 9:35 PM IST

सांगली हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जाणारा गोटखिंडी येथील गणेश उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. यंदाचा हे 43 वे वर्ष असून अखंडपणे कोणत्याही विघ्नविना या ठिकाणी हिंदू-मुस्लिम बांधव मशिदीमध्ये गणपती प्रतिष्ठापणा करण्याची परंपरा जोपासत आहेत.

मशिदीमध्ये गणपती बसवण्याचे हे 43 वे वर्ष सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील न्यू गणेश कला, क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाने मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली. मशिदीमध्ये गणपती बसवण्याचे हे 43 वे वर्ष आहे.हिंदू व मुस्लिम समाजातील कार्यकर्ते एकत्रित येत येथे गुण्यागोविंदाने गणपती उत्सव साजरा करतात. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून गोटखिंडीच्या गणेश उत्सवाकडे पाहिले जाते.

अशी झाली परंपरा सुरू झुंजार चौकातील न्यू गणेश तरुण मंडळाची स्थापना 1980 मध्ये झाली आहे. त्यानंतर एका गणेशोत्सव दरम्यान प्रंचड पाऊस झाला. त्यावेळी तेथील मुस्लिम बांधवानी गणेश मूर्ती भिजू नये,म्हणून गणेश मूर्ती मशिदीच्या आतील बाजूला ठेवली आणि त्यानंतर मशिदीमध्ये गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा सुरू झाली. त्यानंतर गेल्या 43 वर्षांपासून या ठिकाणी मशिदीत गणपती बसवण्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे. हिंदू मुस्लिम बांधव या ठिकाणी एकत्र येऊन दरवर्षी गणपतीची प्रतिष्ठापना करतात दहा दिवस या ठिकाणी मोठ्या भक्तीमय वातावरणात हिंदू मुस्लिम बांधव गणेशाची पूजा करतात आणि त्यानंतर मोठ्या जल्लोषात गणेश विसर्जन करतात.

ABOUT THE AUTHOR

...view details