सांगली - गणेशाच्या आगमनाला अजून काही अवधी असला, तरी सांगलीमध्ये मात्र गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. "चोर गणपती" म्हणून संबोधल्या जाणाऱ्या सांगलीतील गणेश मंदिरात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. कोणताही गाजवजा न करत पहाटे भक्तिमय वातावरणात विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस अगोदर गणेशाची प्रतिष्ठापना करण्याची दोनशे वर्षांची परंपरा आजही कायम ठेवली आहे. गणपती मंदिराचे पुजारी रमेश पाटणकर यांनी ही माहिती दिली.
आले रे आले बाप्पा आले -
सांगलीचे आराध्य दैवत म्हणून गणरायाची ओळख आहे. संपूर्ण सांगलीकरांची या गणेशावर मोठी श्रद्धा आहे. सांगली गणपती पंचायतनतर्फे दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. सांगली संस्थानचे राजे पटवर्धन यांनी गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू केली. दरवर्षी सांगलीमध्ये पटवर्धन घराण्याकडून हा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून गणपती मंदिर भाविकांसाठी बंद आहे. मंदिरातील पुजारी यांच्याकडून दररोज पूजा केली जाते. आता काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. मात्र यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गणपती पंचायतन ट्रस्टकडून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र परंपरागत जोपासण्यात येणारी प्रथा मंदिर प्रशासनाने दरवर्षीप्रमाणे यंदाही जोपासली आहे. ती म्हणजे चोर गणपती प्रतिष्ठापणेची, अशी माहिती गणपती मंदिराचे पुजारी रमेश पाटणकर यांनी दिली आहे.
म्हणून म्हणतात "चोर गणपती" -